अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत १३५ उमेदवार रिंंगणात होते. यापैकी ११४ उमेदवारांना डिपॉझिट (अनामत रक्कम) वाचविता आलेली नाही. ‘नोटा’ वगळता एकूण वैध मतांच्या एकषस्टांस मते न मिळाल्याने अनेक दिग्गज उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. नोटा हे वैध मत असले तरी डिपॉझिटसाठी मतदारसंख्या काढताना ही मते वगळण्यात येतात. त्यानुसार धामणगाव रेल्वे मतदारसंघात डिपॉझिट वाचविण्यासाठी ३३,०८६ मतांची आवश्यकता आहे. या मतदार संघात १९ उमेदवार रिंंगणात होते. यापैकी केवळ वीरेंद्र जगताप व अरुण अडसड यांना हा कोटा पूर्ण करता आला. १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. बडनेरा मतदारसंघात २९,६४६ मतांची आवश्यकता आहे. येथे १५ उमेदवार रिंंगणात होते. यापैकी रवी राणा, संजय बंड, सुलभा खोडके व तुषार भारतीय यांचे डिपॉझिट वाचू शकले. या मतदारसंघात ११ उमेदवारांची अमानत रक्कम शासनजमा झाली. अमरावती मतदारसंघात २६,७११ मतांची आवश्यकता होती. या मतदार संघात १९ उमेदवार रिंग्ांणात होते. यापैकी सुनील देशमुख व रावसाहेब शेखावत वगळता १८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात २८,१७४ मते डिपॉझिटसाठी निर्धारित आहेत. या मतदारसंघात १८ उमेदवार रिंंगणात होते. यापैकी यशोमती ठाकूर, निवेदिता चौधरी (दिघडे) व दिनेश (नाना) वानखडेंव्यतिरिक्त उर्वरित १५ उमेदवारांना अमानत रक्कम वाचविता आलेली नाही.दर्यापूर मतदारसंघात ३०३२५ मतांची आवश्यकता असताना अभिजित अडसूळ, रमेश बुंदेले व बळवंत वानखडे वगळता १६ उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली. मेळघाट मतदारसंघात डिपॉझिट वाचविण्यासाठी २८६८८ मतांची आवश्यकता होती. परंतु प्रभुदास भिलावेकर, केवलराम काळे व राजकुमार पटेल वगळता उर्वरित ३ उमेदवारांचे या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले. अचलपूर मतदारसंघात २९८१९ मते डिपॉझिट वाचविण्यासाठी पाहिजेत. या मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. यापैकी केवळ बच्चू कडू व अशोक बनसोड यांना अमानत रक्कम वाचविता आली. या मतदारसंघात १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. मोर्शी मतदारसंघात डिपॉझीट वाचविण्यासाठी ३०,६४४ हा मॅजिक फिगर होता. या मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंंगणात होते. यापैकी अनिल बोंडे व हर्षवर्धन देशमुख वगळता १७ उमेदवारांची अमानत रक्कम शासनजमा झाली.
११४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
By admin | Updated: October 19, 2014 23:15 IST