शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

बाजार समिती निवडणूक ११३ उमेदवारांची माघार

By admin | Updated: August 28, 2015 00:41 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी...

अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरूवारी शेवटच्या दिवशी एकूण १८६ उमेदवारांपैकी तब्बल ११३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात केवळ ७३ उमेदवार कायम राहिले आहेत.जिल्ह्यात सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखली जाणाऱ्या अमरावती बाजार समितीसाठी येत्या १५ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. २७ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७३ उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. यामध्ये या बाजार समितीवर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११ जागांसाठी सर्वसाधारण मतदारसंघात २३ उमेदवार, महिला मतदारसंघातून दोन जागांसाठी २ उमेदवार, इतर मागासवर्गातील एका जागेसाठी ३ उमेदवार, विमुक्त जाती/भटक्या जमातीसाठीच्या मतदारसंघातील एका जागेसाठी ३ उमेदवार, ग्रामपंचायत मतदारसंघातील एकूण चार जागांसाठी सर्वसाधारण गटातून निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठी १० उमेदवार, अनुसूचित जाती, जमातीसाठीच्या एका जागेकरिता ७ उमेदवारी अर्ज कायम आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघाच्या एका जागेकरिता २ उमेदवार, व्यापारी व अडते मतदारसंघातून दोन जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. व हमाल व तोलारी मतदारसंघाचे एका जागेकरिता ५ उमेदवारांनी नामांकन अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे एकूण ७३ उमेदवारांमधून बाजार समितीचे १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. कायम असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी व उमेदवारांना चिन्ह वाटप शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्या कार्यालयात दुपारी चार वाजता पासून होणार आहे. (प्रतिनिधी)