शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

पश्चिम विदर्भात ११ हजार मे. टन चाऱ्याची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 8:52 PM

अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा२५ लाख ३६ हजार पशुधनासाठी वैरण उत्पादनाची तयारी

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तांच्या माहितीनुसार विभागातील दुष्काळी भागात लहान-मोठी २५ लाख ३६ हजार पशूधन आहेत. या पशूधनाला किमान ११,०२८ मे.टन चाऱ्याची कमी भासणार असल्याने चाºयाची तूट भरून काढायला संबंधित विभागाचे नियोजन सुरू आहे.राज्यातील दुष्काळी गावांत पाणीटंचाईसह वैरणटंचाईची मोठी प्रमाणावर समस्या असल्याने या सर्व ठिकाणी चाºयाचे नियोजन करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या गावातच चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी नियोजन सुरू आहे. यात गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती हा पर्याय म्हणून समोर आलेला आहे. प्रकल्पाला कोरड लागल्याने यामधील पाणीसाठा कमी झालेला आहे. या बुडीत क्षेत्रातील जमिनी शेतकऱ्यांना मका, ज्वारी, बाजरी सारखी चारा पिके घ्यायला नाममात्र एक रूपया भाडेपट्टीने शेतकºयांना देण्यात येणार आहे. विभागात ७,३६० हेक्टर गाळपेर क्षेत्रात ६३९ क्विंटल मका, ५१६ क्विंटल ज्वार, ८८ क्विंटल बाजरी व १४ क्विंटल न्यूट्रीफिड बियाण्यांची आवश्यकता आहे. यासाठी विभागात सद्यस्थितीत २,१३५ अर्ज पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झालेले आहेत.राज्यासाठी उपलब्ध १० कोटींमधून विभागात आरकेव्हीवाय योजनेंतर्गत ४५६ क्विंटल मका बियाणे प्राप्त आहेत. यामध्ये ४५,६४५ मे.टन हिरवी वैरण व ज्वारीसाठी ५४२ क्विंटल बियाणे प्राप्त आहेत. यामधून ६०,९९५ मे.टन हिरवे वैरण उपलब्ध होणार आहे. असे एकूण १,०६,६०० मे.टन चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. २,२७० हेक्टरमध्ये हे नियोजन आहे. यासाठी १४,४९२ अर्ज प्राप्त झाले असून, यामधून १२,७३९ लाभार्थ्यांची निवड पशुसंवर्धन विभागाने केली आहे.जिल्हानिहाय पशुधन, लागणारा चाराअमरावती जिल्ह्यातील १०,०३,५५५ पशुधनाला प्रतीमाह १,०५,२४२ मे.टन चाºयाची आवशकता आहे. अकोला जिल्ह्यात ४,५२,४८८ पशुधनाला ५२,३६२ मे.टन., बुलडाणा जिल्ह्यात १०,२०,३३७ पशूधनाला १,१४,७४३ मे.टन, वाशीम जिल्ह्यात ४,५७,५२४ पशुधनाला ५३,५१० मे.टन. व यवतमाळ जिल्ह्यातील ११,४०,३३९ पशुधनाला १,४१,२७७ मे. टन चाऱ्याची आवश्यकता आहे.अमरावती, बुलडाण्यात चाऱ्याची तूट* विभागातील दुष्काळी २८ तालुक्यांत २०,३५,७६४ पशुधन आहे. यासाठी जून २०१९ पर्यंत १९,४३,८८७ मे.टन चारा लागेल. मात्र, १९,५४,९१५ मे.टन चारा उपलब्ध होणार असल्याने ११,०२८ मे.टन चाºयाची तूट भासणार आहे. यामध्ये अकोला, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यात चाऱ्याची तूट बासणार नसली तरी अमरावती जिल्ह्यात १,००,५५६ मे.टन. व बुलडाणा जिल्ह्यात १,८३,५३० मे.टन चाऱ्याची तूट भासणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेती