शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

लाक डाचे ११ नमुने तपासणीसाठी डेहरादूनला पाठविणार

By admin | Updated: March 19, 2016 00:14 IST

वलगाव मार्गालगतच्या नेहा वूड इंडस्ट्रिज येथे गत दोन दिवसांपासून वनविभागाने लाकूड साठा तपासण्याची मोहीम राबविली.

उपवनसंरक्षकांची कारवाई : नेहा वूड संचालकाविरुद्ध प्राथमिक वनगुन्हे दाखलअमरावती : वलगाव मार्गालगतच्या नेहा वूड इंडस्ट्रिज येथे गत दोन दिवसांपासून वनविभागाने लाकूड साठा तपासण्याची मोहीम राबविली. यात आंबा लाकूड आढळून आले. मात्र हे लाकूड किती दिवस पूर्वी कापले, त्याचे आर्युमान किती? हे तपासण्यासाठी लाकडाचे ११ नमुने ताब्यात घेऊन ते डेहरादून येथील प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले जाणार आहे. तत्पूर्वी वनविभागाने नेहा वूड संचालकाविरुद्ध प्राथमिक वनगुन्हे दाखल केले आहे.नेहा वूड येथे नियमबाह्य लाकूड असल्याची तक्रारी उपवनसंरक्षकाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार या अर्जांची गोपनीयरित्या पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापडा रचून नेहा वूड इंडस्ट्रिजवर धाडसत्र राबविण्यात आले. आंबा प्रजातीच्या लाकडासह इतरही प्रजातीचे लाकूड मोठ्या प्रमाणात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आले. लाकूड तपासताना त्याची वाहतूक परवानगी (टीपी) पास तपासण्यात आली. मात्र नेहा वूड संचालकांकडे असलेल्या टीपी पासनुसार जास्त लाकूड साठा असल्याचा अंदाज वनविभागाला आहे. वनविभागाने जारी केलेल्या टीपी पास यांचा मेळ जुळत नसल्यामुळे लाकडाची प्रयोगशाळेत तपासणी करण्याचा निर्णय उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांनी घेतला. त्यानुसार वडाळीचे वनपरिक्षेत्रधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी लाकडाचे ११ नमुने ताब्यात घेण्यतापूर्वी नेहा वूड संचालकाविरुद्ध प्राथमिक वनगुन्हा दाखल केला आहे. १.०५६ टन लाकूड जादा असल्याबाबत वनविभागाला संशय आहे. आंबा लाकूड नेमके आणले कोठून हे शोधण्याचे काम वनविभाग करीत आहे. नेहा वूडमध्ये असलेले आंबा लाकूड २२ लाख रुपये किमतीचे असल्याचा अंदाज वनविभागाचा आहे. लाकूड आणल्याबाबत टीपी पास असल्या तरी त्या पासेसमध्ये गौडबंगाल असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लाकडाचे आर्युमान तपासण्यासाठी प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात येईल.आरागिरणी सील होण्याचे संकेतनेहा वूड इंडस्ट्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड साठा असल्याचे निदर्शनास आले आहे. पहिल्या टप्प्यात वनगुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतर वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल पाठविला जाईल. उपवनसंरक्षकांच्या आदेशानुसार आरागिरणी सीलची कारवाई होईल, असे आरएफओ पडगव्हाणकर यांनी सांगितले. यात वननियमानुसार चौकशी करण्यात आली आहे.साईकृपा, वाह ताजची तपासणीवनविभागाच्या चमूने गुरुवारी नेहा वूडसह स्थानिक नेहरु टिंबर मार्केटमधील साईकृपा आरागिरणी व ताजनगर परिसरातील वाह ताज आरागिरणीची तपासणी केल्याची विश्वसनीय माहिती आहे. तसेच अन्य दोन आरागिरण्यांची तपासणीदेखील करण्यात आली असून या आरागिणी तपासणी अहवालाकडे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.डेहरादूनच्या अहवालावर बरेच काही अवलंबूननेहा वूडमधून ११ लाकडाचे नमुने डेहरादून येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. लाकडाच्या तपासणी अहवालावर बरेच काही अवलंबून आहे. टीपी पासची तारीख आणि लाकडाचे आर्युमान यात फरक असला तर न्यायालयात ही बाब ठोसपणे मांडता येईल, असे वनविभागाचे म्हणणे आहे.नेहा वूडची तपासणी पूर्ण झाली आहे. आरएफओकडून अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आरागिरणीत नियमबाह्य लाकूड असेल तर नक्कीच सीलची कारवाई होईल. यात कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही.- राजेंद्र बोंडे , सहायक वनसंरक्षक, अमरावती.