शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

‘क्लस्टर हॉटस्पॉट’मधील ११ व्यक्तींना 'डिस्चार्ज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

यामध्ये हबीबनगर येथील दोन पुरूष, हनुमाननगर येथील दोन पुरूष, शिराळा येथील चार पुरुष, बडनेरा येथील एक पुरुष व वरूड येथील दोन महिलांचा समावेश आहे. मंगळवारी येथील जिल्हा कोविड रुग्णालयातून २४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. त्यामुळे जिल्ह्यात ५६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने १६ व्यक्तींवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देनव्या गाईडलाईनने दिलासा : उपचारानंतर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६७ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉटमधील ११ संक्रमित व्यक्तींना १० दिवसांच्या उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना बुधवारी दुपारी कोरोनामुक्त करण्यात आले. आरोग्य विभागाने जारी केलेल्या नव्या गाईड लाइननुसार या रुग्णांमध्ये १० दिवसांत लक्षणे नसल्याने त्यांना 'डिस्चार्ज' केल्या जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याऱ्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक ६७ टक्के आहे.यामध्ये हबीबनगर येथील दोन पुरूष, हनुमाननगर येथील दोन पुरूष, शिराळा येथील चार पुरुष, बडनेरा येथील एक पुरुष व वरूड येथील दोन महिलांचा समावेश आहे. मंगळवारी येथील जिल्हा कोविड रुग्णालयातून २४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. त्यामुळे जिल्ह्यात ५६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने १६ व्यक्तींवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करीत त्यांना निरोप दिला.ज्या संक्रमित रुग्णाला १० दिवस झाले व त्यांचे ‘एसपीओ-२’ चांगले आहे व रुग्णांची लक्षणे सुरू झाल्यानंतर ७, ८ व ९ व्या दिवशी ताप नसेल तर अशा सौम्य स्वरुपाच्या रुग्णांना कोरोनामुक्त करण्याच्या नव्या गाइडलाइन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ९ मे रोजी दिल्या. त्यानुसार मंगळवारी २४ कोरोना विषाणूच्या संक्रमितांना 'डिस्चार्ज' दिल्यानंतर बुधवारी ११ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले. मात्र, त्यांना पुढील १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागणार आहेत. यासाठीचे हमीपत्र त्यांचेकडून लिहून घेतले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.दरम्यान, मंगळवारी महापालिकेत शहरातील खासगी डॉक्टरांची बैठक घेण्यात आली.पाच दिवस कोर्स, पाच दिवस निरीक्षणसंक्रमित व्यक्तीला कोविड रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची दोन वेळा तपासणी केली जाते. पहिले पाच दिवस कोविड-१९ चा कोर्स दिला जातो व नंतरच्या पाच दिवसांत त्यांना निरीक्षणात ठेवले जातात. या काळात त्यांच्यामध्ये काही लक्षणे न दिसल्यास त्यांना 'डिस्चार्ज' दिला जातो. यापूर्वी हा कालावधी १४ दिवसांचा होता. यामध्ये १५ व १६ व्या दिवशी त्यांच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यासच ‘त्या’ व्यक्तीला कोरोनामुक्त करून घरी पाठविले जात होते. आता नव्या नियमामुळे अधिकाधिक रुग्णांना याचा दिलासा मिळाला आहे. मात्र, रुग्ण जर आयसीयूमध्ये असेल. मात्र, त्याला 'डिस्चार्ज' दिला जात नसल्याचे डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.आरोग्य विभागाच्या नव्या गाइडलाइननुसार ज्या व्यक्तींना १० दिवसांत लक्षणे नाहीत, अशाच व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. यामध्ये पाच दिवसांचा औषधांचा कोर्स व पाच दिवस या व्यक्तींना आॅर्ब्झव्हेशनमध्ये ठेवले जातात व त्यानंतर लक्षणे नसल्यास अशा रुग्णांना 'डिस्चार्ज' दिला जातो.- डॉ श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या