शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘१०८’ अ‍ॅम्बुलन्स सेवा आता 'अ‍ॅप'वरही

By admin | Updated: January 16, 2017 00:09 IST

राज्याच्या इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या ‘१०८’ या अ‍ॅम्बुलन्स सेवेसाठी आता मोबाईल 'अ‍ॅप' तयार करण्यात आले आहे.

रुग्णांना दिलासा : घटनास्थळी मिळणार लवकरात लवकर वैद्यकीय मदतअमरावती : राज्याच्या इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या ‘१०८’ या अ‍ॅम्बुलन्स सेवेसाठी आता मोबाईल 'अ‍ॅप' तयार करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत या अ‍ॅपवर केवळ एकच क्लिक केल्यास दहा सेकंदात अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसच्या कॉल सेंटरवर संदेश जाऊन काही वेळातच अ‍ॅम्बुलन्स घटनास्थळी वैद्यकीय मदतीसाठी हजर होणार आहे. २६ जानेवारी २०१६ रोजी ही मोफत ‘१०८’ क्रमांकाची अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर फोन केल्यास काही वेळातच डॉक्टरसहित सुसज्ज अ‍ॅम्बुलन्स घटनास्थळी येते. आतापर्यंत या सेवेमुळे १२ लाख जणांचे प्राण वाचले आहेत. रस्ते अपघातापासून हार्ट अ‍ॅटॅक, प्रसूती, इमारत दुर्घटना, स्फोट अशा विविध आपत्कालीन परिस्थितीत ‘१०८’ अ‍ॅम्बुलन्स सेवा मदतीला धावून जाते. आता या अ‍ॅम्बुलन्स सेवेसाठी अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅम्बुलन्ससाठी फोन करणाऱ्या व्यक्तींना बहुतेकवेळा घटनास्थळाचा नेमका पत्ता सांगता येत नाही. त्यामुळे ते ठिकाण शोधून काढण्यात वेळ जाण्याची शक्यता असते. पण मोबाईल अ‍ॅपमुळे वैद्यकीय मदत नेमकी कोणत्या ठिकाणी हवी आहे, त्याची अचूक माहिती मिळते व अ‍ॅम्बुलन्स वेळेत घटनास्थळी पोहोचते. (प्रतिनिधी)असे काम करणार 'अ‍ॅप'गुगल प्ले स्टोअरवरून कोणत्याही अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइलवर हे 'अ‍ॅप' डाऊनलोड करता येईल.त्यासाठी संबंधित व्यक्तीचे नाव, ई-मेल, मोबाईल क्रमांक, वय आदी तपशील सादर करावा लागेल. रुग्णाला कोणत्या स्वरुपाची वैद्यकीय मदत हवी त्याचा ‘आॅप्शन’ मोबाईल स्क्रीनवर येणार.त्यावर क्लिक केल्यास दहा सेकंदांत मदतीचा संदेश हेल्पलाईनवर जाणार. ही सेवा जीपीआरएसद्वारे जोडली असल्याने वैद्यकीय मदत मागणारी व्यक्ती कोणत्या भागात आहे. त्याची माहिती मिळेल. त्याआधारावर अ‍ॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचणार. हे 'अ‍ॅप डाऊनलोड' केलेल्या व्यक्तीला जवळच्या नातेवाईकांचे किंवा मित्रांचे संपर्क क्रमांकही या सेवेकडे नोंदविण्याची सोय आहे. आपत्कालीन परिस्थिती जवळच्या नातेवाईकांनाही माहिती देण्याची सोय यामध्ये आहे.