शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

इमामनगरात १०५ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:17 IST

शनिवारी सायंकाळच्या वादळी पावसामुळे लालखडी परिसराजवळील इमामनगरातील १०५ घरांची पडझड झाल्याने रहिवासी नागरिकांचे मोठे नुकसान झाले. आ. रवि राणा, महापौर संजय नरवणे, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह महापालिकेच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पंचनाम्याला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देवादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका : महापौरांसह महापालिकेची चमू पोहोचली घटनास्थळी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शनिवारी सायंकाळच्या वादळी पावसामुळे लालखडी परिसराजवळील इमामनगरातील १०५ घरांची पडझड झाल्याने रहिवासी नागरिकांचे मोठे नुकसान झाले. आ. रवि राणा, महापौर संजय नरवणे, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह महापालिकेच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पंचनाम्याला प्रारंभ झाला. या पडझडीत इमामनगरातील एक रहिवासी तरुण जखमी झाला.पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या वादळी वाºयामुळे शहरातील शेकडो झाडे कोसळली, तर अनेक ठिकाणी पडझड झाली होती. शनिवारी सायंकाळी पुन्हा वादळी वाºयासह आलेल्या पावसाचा इमामनगराला फटका बसला. शहरात इतरत्र नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. वादळी पावसामुळे खुल्या जागेत वसलेल्या इमामनगरातील काही कच्च्या घरांचे बांधकाम कोसळले. काही घरांवरील टिनांचे छपरे उडाल्याने खळबळ उडाली. अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने रात्रीच्या वेळेत नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यांनी कशीबशी रात्र काढली. मात्र, सकाळपासून प्रशासनाच्या मदतीच्या अपेक्षेत नागरिक होते.महापौर संजय नरवणे, सभागृहनेता सुनील काळे, शिक्षण समिती सभापती गोपाल धर्माळे, नगरसेवक विजय वानखडे यांनी रविवारी इमामनगरात जाऊन पाहणी केली. तेथील १०५ घरांची पडझड झाली आहे. या घरांचा पंचनामा करण्याचे निर्देश त्यांनी दिले तसेच सानुग्रह निधी त्वरित वितरणाच्या सूचना यावेळी दिल्या. तहसीलदार संतोष काकडे, तलाठी बाहेकर, पाटेकर, धर्माळे, लांडगे उपस्थित होते. घटनेच्या माहितीवरून अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते.बेघरांना पाच हजारांचे अनुदानतहसील कार्यालयामार्फत इमामनगरातील रहिवाशांच्या नुकसानाचे निरीक्षण करण्यात आले. पडझड झालेल्या ८५ घरांचे पंचनामे रविवारी झाले. तेथील बेघरांना सानुग्रह अनुदान स्वरूपात प्रत्येकी पाच हजारांची मदत करण्यात आली. याशिवाय अंशत: व पूर्णत: बेघर झालेल्या नागरिकांच्या घरांचे मूल्याकंन महापालिकेकडून केल्यानंतर त्यांनासुद्धा मदत केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार संतोष काकडे ‘लोकमत’शी बोलताना दिली.आ. रवी राणा यांची भेटइमामनगरातील घरांच्या पडझडीची माहिती मिळताच रविवारी आ. रवि राणा यांनी परिसरात जाऊन पाहणी केली. तेथील नागरिकांच्या नुकसानाविषयी माहिती जाणून घेतली. शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले.