अमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने बीटी बियाण्यांच्या पाकिटावर शंभर रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भात दरवर्षीच्या खरीप हंगामात कपाशीचा पेरा जवळपास सर्वच जिल्ह्यात अधिक असतो. अलीकडच्या काळात बीटी बियाण्यांचे बाजारभाव प्रचंड वधारल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. सध्या बाजारात आंध्र प्रदेशातील बियाणे कंपन्यांचा बोलबाला आहे. गावागावांत जाहिरात युध्द सुरु आहे. शासनाचे उपसचिव रा.बा. घाडगे यांनी शासकीय अधिसूचना काढून बीटी बियाण्यांच्या प्रती पाकिटावर १०० रुपये कमी केले आहे. बीटीचे ८३० रुपयांचे पाकीट आता ७३० रुपयांना तर बोलगार्डचे बीटी बियाण्यांचे ९३० रुपयांचे पाकीट आता ८३० रुपयांना मिळणार आहे. खरिपाच्या तोंडावर शासनाने शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
बीटी बियाण्यांवर १०० रुपये कमी
By admin | Updated: June 10, 2015 00:14 IST