पालकमंत्री : सीईओ, एसडीओंना सूचनाअमरावती : मेळघाटात जिल्हा परिषद शाळांवर कार्यरत शिक्षकांच्या बदलीकरिता शिक्षक कृती समितीने सुरू केलेल्या आंदोलनाची शेवट शनिवारी झाला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शिक्षक बँकेचे संचालक सुदाम राठोड यांना निंबू-सरबत पाजून मेळघाटातील जि.प. शिक्षकांच्या १०० टक्के बदल्या करण्याचे आश्वासन दिल्याने शनिवारी उपोषण मागे घेण्यात आले.ना. पोटे म्हणाले, तुमच्या जागेवर मी जरी असतो तरी एवढे वर्षे एकाच ठिकाणी काढू शकलो नसतो. त्यामुळे रोटेशननुसार मेळघाटातील शिक्षकांच्या बदल्या शंभर टक्के बदल्या करण्याचे आश्वासन उपोषणकर्ते शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, धारणीचे डीओ यांची उपस्थिती होती. मेळघाटात सतत १२ वर्षांपासून कार्यरत शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रोटेशन पद्धतीने कराव्यात, यासाठी २० एप्रिलपासून मेळघाट शिक्षक कृती समितीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी त्याच्या आरोग्याची तपासणी वैद्यकीय तज्ञांनी केली असता काहींचे रक्तदाब कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शनिवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्थानिक जिल्हा परिषदेसमोर उपोषण मंडपाला भेट दिली. उपोषणकर्त्यामध्ये कृती समितीचे सूरज वाघमारे, राजेंद्र गावंडे, डी.आर जामनिक, उज्ज्वल पंचवटे, प्रफुल्ल शेंडे, विजय रायबोले, मंगेश वाघमारे, सुदाम राठोड, प्रमोद डोंगरे, मनीष काळे, रवींद्र घवळे, नीलेश टोम्पे, विनोद राठोड व इतर शिक्षकांचा समावेश होता. अन्याग्रस्त शिक्षणकांच्या उपोषण मंडपाला काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके, जि.प. उपाध्यक्ष सतीश हाडोळे, शिक्षण सभापती गिरीश कराळे, सदस्य महेंद्रसिंग गैलवार, मेळघाटचे आ. प्रभुदास भिलावेकर, श्रीकांत देशपांडे आदींनी भेटी दिल्या होत्या.
मेळघाटातील शिक्षकांच्या बदल्या १०० टक्के करूे
By admin | Updated: April 24, 2016 00:22 IST