शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्टनगरातील १०० झोपड्या जमीनदोस्त

By admin | Updated: January 14, 2015 23:00 IST

स्थानिक ट्रान्सपोर्टनगरातील निर्माणाधीन ‘मॉल’च्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे

अमरावती : स्थानिक ट्रान्सपोर्टनगरातील निर्माणाधीन ‘मॉल’च्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. तब्बल १०० अतिक्रमित झोपड्या या कारवाईदरम्यान हटविण्यात आला. महापालिका अतिक्रमण हटाव पथकाचे निरीक्षक उमेश सवई यांनी सांगितले की, ट्रान्सपोर्टनगरातील निर्माणाधीन ‘मॉल’च्या जमिनीवर परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांनी अतिक्रमण केले आहे. महापालिकेने या नागरिकांना यापूर्वी स्वत:हून अतिक्रमण हटविण्याबाबतच्या नोटीस बजावल्या होत्या. परंतु नोटीसचे उत्तर न मिळाल्याने बुधवारी महापालिकेने पोलिसांच्या सहकार्याने परिसरातील अतिक्रमण हटविले. सकाळी ७.१५ वाजता ही कारवाई सुरू झाली. यावेळी नागपुरी गेट व गाडगेनगरचे ठाणेदार तसेच पोलीस पथक मिळून एकूण ७० ते ८० कर्मचाऱ्यांचा ताफा उपस्थित होता. सहायक आयुक्त एल.एन.तडवी यांच्या नेतृत्वात या भागातील तब्बल १०० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर अतिक्रमित दुकानेदेखिल हटविण्यात आल्या आहेत. मागील वर्षभरापासून या अतिक्रमणामुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. शेवटी पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र संबंधित अतिक्रमणधारकांची ऐन थंडीच्या दिवसांत हाल होत आहे.