शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

एका एकरात दहा लाखांचे टोमॅटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:13 IST

पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठेतील शेतमालाच्या मागणीचा अभ्यास करून शेतीतून १०० दिवसांत एका एकरात १० लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे.

ठळक मुद्देविक्रमी उत्पादन : अतुल लकडे यांची यशोगाथा शेतकºयांसाठी प्रेरणादायी

लोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठेतील शेतमालाच्या मागणीचा अभ्यास करून शेतीतून १०० दिवसांत एका एकरात १० लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. ही किमया अचलपूरच्या अब्बासपुरा येथील अतुल लकडे या शेतकऱ्याने साधली आहे.अब्बासपुरा येथील युवा शेतकरी अतुल पुरुषोत्तमराव लकडे (३०) यांनी यावर्षी एका एकरात टोमॅटोची लागवड केली. साधारणत: जुलै महिन्यात टोमॅटो बियाणे आणून रोपे तयार करण्यात आली. यानंतर शेतात झिकझॅक पद्धतीने मल्चिंग टाकून ५ फूट बाय २ बेड अशा पद्धतीने साधारणत: दीड फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व खताचे नियोजन केले. ५० टक्के रासायनिक व ५० टक्के सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली. सहा वेळा जीवामृत झाडांना दिले, तर पांढरी माशी, तुरतुडे यांचा बंदोबस्त करण्याकरिता ५० पिवळे ट्रॅप या टोमॅटोच्या शेतात बसविले होते.एका एकरात लकडे यांना दोन हजार कॅरेट टोमॅटोचे उत्पादन झाले. परतवाडा, अंजनगाव या बाजारपेठेमध्ये या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी होती. ६५० ते १५०० रूपये प्रति कॅरेट दर मिळाला.आजही या टोमॅटोचे उत्पादन सुरूच आहे. बी-बियाण्यापासून तर मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोचे झाडे बांधणे, फळे सोडणे, निंदण-खुरपण यासाठी एका एकरात सरासरी दोन लाख रुपये खर्च त्यांना आला. खर्च वजा करून अतुल लकडे यांना एका एकरात जवळपास १० लाखांचे उत्पन्न टोमॅटो पिकाने मिळवून दिले. त्यांच्या या यशाचे पंचक्रोशीत कौतुल होत असून, त्यांच्या शेतीला भेट देऊन मार्गदर्शन मागणाऱ्यांची संख्याही बरीच आहे.