शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आगीत गावंडगावातील १0 घरांची राखरांगोळी

By admin | Updated: May 25, 2014 23:12 IST

तालुक्यातील गावंडगाव येथील १0 घरे शनिवारी मध्यरात्री ३ वाजता भयंकर आगीच्या विळख्यात सापडलीत. यात घरातील धान्य, कपडे आणि इतर साहित्याची राखरांगोळी झाली. सुदैवाने या १0 घरांमधील ५0 स्त्री-पुरूष व

१0 घरांतील ५0 जण सुरक्षित : ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न, मदतीसाठी पुढे आले अनेक हात

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील गावंडगाव येथील १0 घरे शनिवारी मध्यरात्री ३ वाजता भयंकर आगीच्या विळख्यात सापडलीत. यात घरातील धान्य, कपडे आणि इतर साहित्याची राखरांगोळी झाली. सुदैवाने या १0 घरांमधील ५0 स्त्री-पुरूष व मुले बचावली.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री अंदाजे तीन वाजता घरांना आग लागल्याचे संबंधित कुटुंबाना समजले. अंधार आणि वार्‍याचा भयंकर जोर असल्यामुळे आगीचा अंदाज आला नाही. तरी ग्रामीण कुटुंबात असलेल्या इंधनाच्या साठवणुकीमुळे ही आग मोठय़ा प्रमाणावर पसरली. गावात हलकल्लोळ माजला व आगीत सापडलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी ग्रामस्थांनी धाव घेऊन आजूबाजूच्या तुराट्या-पर्‍हाट्याच्या गंज्या बाजुला सारल्या. गावातील पाण्याच्या टाकीतील पाणी आगीवर ओतले. आगीत सापडलेल्या कुटुंबांनासुद्धा सुखरुप बाहेर काढण्यात आले. या आगीत मधुकर सखाराम ढोकणे, बाळकृष्ण सहदेव ढोकणे, बाबुलाल सहदेव ढोकणे, दिलीप नामदेव ढोकणे, अशोक नामदेव ढोकणे, पुष्पा श्रीराम ढोकणे, दादाराव सदाशिव ढोकणे, विठ्ठल रामदास मारबते व त्यांचे वडील रामदास मारबते यांची घरे जळून खाक झाली. घरातील संपूर्ण सामान, धान्य, कपडे जळून खाक झाले.

आग विझविताना ईलेक्ट्रिकच्या सव्र्हीस लाईन जळून अंगावर पडण्याचा धोका असल्याने लाईन बंद करण्यात आली. दादाराव ढोकणे यांच्या दोन घरातील काहीही साहित्य शिल्लक राहिले नाही. त्यांच्या कपाटातील रोख रक्कम व सोने आगीत भस्मसात झाले. अंजनगाव सुर्जी, अचलपूर येथील अग्निशमन दलांनी आग विझविण्यास मदत केली. महसूल प्रशासनाने पंचवीस लाख रूपयांच्या हानीचा अंदाज वर्तविला आहे. तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटुंबास धान्य व रॉकेल दिले आहे. आमदार अडसूळ यांचे खासगी स्वीय सहायक रुपेश गणात्रा यांनी ७0 टिनांची तातडीची मदत आपादग्रस्तांना दिली. घटनास्थळी शिवसेनेचे बाळासाहेब हिंगणीकर, विजय होटे, विकास येवले व माजी सभापती नंदकिशोर काळे, रिपाइंचे बळवंत वानखडे यांनी भेटी दिल्या. रहिमापूरचे ठाणेदार संजय सोळंके हे गावकर्‍यांना धीर देण्यासाठी पूर्णवेळ उपस्थित होते. अंजनगाव, पथ्रोट, येवदा पोलीस पथकांनीसुध्दा भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)