शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका, नगरपरिषदांना १० कोटी देण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: January 10, 2015 00:05 IST

जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीसी) मधून महापालिका, नगरपरिषदांना १० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. हल्ली डिपीसीचे बजेट १४५ कोटी रुपये असून ते ३५० किंवा ५०० कोटी कसे होईल, ...

अमरावती : जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीसी) मधून महापालिका, नगरपरिषदांना १० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. हल्ली डिपीसीचे बजेट १४५ कोटी रुपये असून ते ३५० किंवा ५०० कोटी कसे होईल, यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार, अशी माहिती राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, खनिकर्म राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे शुक्रवारी दिली.जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या पाहणीचा मॅराथॉन दौरा आटोपल्यानंतर पालकमंत्री पोटे शासकीय विश्रामभवनात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सकाळी ११ वाजता सुरु झालेला हा पाहणी दौरा दुपारी ४ वाजता आटोपला. प्रवीण पोटे यांनी सर्वप्रथम मोझरी विकास आराखड्यातंर्गत होणाऱ्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी काही कामांवर त्यांनी निकृष्ट असल्याचा ठपका ठेवला. शासन निधी हा जनतेचाच पैसा असून या निधीतून होणारी कामे उत्तम दर्जाचीच असावी, त्याकरीता हा पाहणी दौरा असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना भेटणारशासन निधी खर्च करताना आता लोकप्रतिनिधींनाही मानसिकता बदलावी लागेल. कोणती कामे करावयाची आहेत, ही बाब जनतेतूनच पुढे आली पाहिजे. मोझरी विकास आराखड्यात काही कामे चांगल्या दर्जाची होत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून संबंधित कंत्राटदारांना बोलावून ही कामे व्यवस्थितरीत्या करण्याचे सांगितले जाईल. अन्यथा आपल्या पद्धतीने समज देऊ असे ते म्हणाले. जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली असून डीपीसीचे बजेट वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन १४५ कोटी रुपयांचे बजेट ५०० कोटीवर कसे पोहोचले, याला प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील बहुतांश रस्त्यांवर निर्माण करण्यात आलेल्या गतिरोधकांचा प्रश्न गंभीर वळण घेत असून अपेक्षेपेक्षा जास्त निर्माण करण्यात आलेले हे गतिरोधक वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. असे गतिरोधक नियमावलीनुसार कमी केले जाईल. शासनाच्या टोलमुक्ती धोरणातून नांदगाव पेठ येथील टोल वसुली नाका हटविण्याला प्राधान्य आहे. यासाठी ना. चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील नगरपरिषदा व महापालिकेला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठीचे पावले उचलली जात असून १० कोटींचा निधी या संस्थांना देण्याचा प्रस्ताव असल्याचे पोटे म्हणाले. यावेळी आ. यशोमती ठाकूर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे आदी उपस्थित होते.