शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी इर्विनमधून दहा बालके सावंगी मेघेला रवाना

By उज्वल भालेकर | Updated: January 18, 2024 18:52 IST

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या विविध आजारांचे वेळीच निदान करून आवश्यक शस्त्रक्रिया देखील केल्या जातात.

अमरावती : हृदयविकाराचा त्रास असलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील दहा बालकांना शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णाल (इर्विन) येथून या बालकांना घेऊन रुग्णवाहिका रवाना झाली. या सर्व बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या विविध आजारांचे वेळीच निदान करून आवश्यक शस्त्रक्रिया देखील केल्या जातात.  २ जानेवारी रोजी इर्विनमध्ये हृदयाचा त्रास असलेल्या ९४ बालकांचे टू-डी इको करण्यात आले होते. यामध्ये ३० बालकांच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. त्यामुळे या बालकांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय रुग्णालाय प्रशासनाने घेतला होता. त्याच अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शनामध्ये यातील पहिल्या टप्प्यात दहा बालकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मंगळवारी सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रीती मोरे यांनी शस्त्रक्रियेसाठी बालकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला हिरवी झेंडी दाखविली. यावेही निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप हेडाऊ, आरबीएसके पर्यवेक्षक नीलेश पुनसे तेसच रुग्णालयातील इतर अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती