शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १ हजार ८१ नगरपरिषद कर्मचारी संपावर

By admin | Updated: July 15, 2014 23:54 IST

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अमरावती जिल्ह्यातील १० नगरपरिषदांमधील १ हजार १५१ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे सुमारे १ हजार ८१ कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे याठिकाणचे प्रशासकीय

अमरावती : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अमरावती जिल्ह्यातील १० नगरपरिषदांमधील १ हजार १५१ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे सुमारे १ हजार ८१ कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे याठिकाणचे प्रशासकीय व स्वच्छतेची सर्व कामे ठप्प झाली आहे. या संपामध्ये नगरपरिषदांमधील अतिआवश्यक असलेल्या अग्निशमन, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्य शासनातर्फे देण्यात येणारे वेतन ८० ऐवजी शंभर टक्के देण्यात यावे, सन २००० पूर्वी पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमित करावे, अनुकंपाधारकांच्या जागा भराव्यात आदी मागण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी १५ जुलैपासून संप सुरू केला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नगरपालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून होमगार्डची मदत घेतली आहे. (प्रतिनिधी)चांदूररेल्वेतील ३८ कर्मचारी संपावरचांदूररेल्वे: नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात चांदूररेल्वे नगरपालिकेचे ४४ पैकी ३८ कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे स्वच्छतेचे कामकाज प्रभावित झाले आहे. कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन पाणीपुरवठा व चार कर्मचारी अस्थाई असल्याने तेच कर्मचारी सहा कार्यालयात आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश खवले यांनी दिली. कर्मचारी संपावर असल्याने नागरिकांना आल्या पावली परतावे लागले. यात सफाई कामगारही सामील केल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहे.चांदूरबाजारमध्ये कामे रखडलीचांदूरबाजार : नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आपल्या संपाला सुरूवात केल्यामुळे नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. स्थानिक नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभाग वगळता सर्व ६४ कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे. या संपामुळे नगरपरिषदेसंबंधित कामे पूर्णपणे रखडली आहेत. विशेष म्हणजे पावसाने आता हजेरी लावल्याने गावात तसेच नगरपरिषदेच्या हद्दीत स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील सर्व सफाई कामगार संपात सहभागी असल्यामुळे संप सुरुच राहिल्यास स्वच्छतेचा मोठा प्रश्न उभा ठाकणार आहे.