शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

१,९६३ गावांची नजरअंदाज ७० पैसेवारी

By admin | Updated: October 4, 2016 00:18 IST

जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून ३५ दिवस पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम जमिनीतील सोयाबीन करपले,

उफराटा न्याय : सोयाबीन बाधित, उडीद, कपाशीचेही नुकसानअमरावती : जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून ३५ दिवस पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम जमिनीतील सोयाबीन करपले, अती पावसाने तूर जळाली व आता दोन आठवड्यांपासून परतीच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगात कोंब निघत आहेत. कपाशीची पानगळ होत असताना जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ७० पैसे जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. यामुळे शेतकरी वर्गात चीड व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस पडला. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान ८१४ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९७७.१ मि.मी.पाऊस पडला. पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने पिके चांगली होती. मात्र सततच्या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढून हजारो एकरांतील तुरीवर आकस्मिक मर येऊन तूर जागीच जळाली.७ आॅगस्टपासून पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. हे सोयाबीन करपले, दाना बारीक होऊन शेंगा पोचट राहिल्या. आता सोयाबीन कापनीवर आले असताना गेल्या १५ दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, वातावरणात व जमिनीत वाढलेली आर्द्रता यामुळे परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या शेंगांमधून दाने अंकुरात आहे. तसेच उडदाच्या गंजीमध्येही दाण्यांना कोंब फुटले आहे. अति पावसामुळे बीटी कपाशीची पातेगळ होत आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात सरासरी उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमिवर ३० सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाने १ हजार ९६३ गावांची नजरअंदाज पैसेवारी ही ७० पैसे जाहीर केल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी शासकीय मदत मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)