शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प., पं.स. निवडणूक; ‘आॅनलाइन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:08 IST

आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अडचणी येऊ नये, यासाठी तालुका स्तरावर तांत्रिक तज्ज्ञांची पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १८ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून, राज्य निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीतूनच उमेदवारांना ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज व शपथपत्र भरावे लागणार आहेत. आॅनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषद व त्यांतर्गत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देत, निवडणुकीची जिल्ह्यातील ग्रामीण भागात आचारसंहिता लागू करण्यात आली असून, आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज व शपथपत्र सहज रीतीने भरता यावे, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महाआॅनलाइनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, या सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज व शपथपत्र भरणे आवश्यक आहे. आॅनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे दाखल करावी लागणार आहे. आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अडचणी येऊ नये, यासाठी तालुका स्तरावर तांत्रिक तज्ज्ञांची पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १ हजार १७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार असून, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून ६ हजार ७१० अधिकारी-कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते.

जि.प. गटांचे प्रवर्गनिहाय असे आहे आरक्षण!४जिल्हा परिषदेचे एकूण ५३ गट असून, त्यामध्ये अनुसूचित जाती-६, अनुसूचित जाती स्त्री-६, अनुसूचित जमाती-२, अनुसूचित जमाती स्त्री-३, नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र)-७, नामाप्र स्त्री-७ आणि सर्वसाधारण-११ व सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी ११ गट आरक्षित आहेत

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूकAkola ZPअकोला जिल्हा परिषद