शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेसाठी अट्टहास

By admin | Updated: August 10, 2016 01:23 IST

महपालिकेच्या खर्चाने वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा नगरसेवकांचा अट्टहास दिसून येतो. विशेष म्हणजे नगरसेवक स्वत:चे निवासस्थान आणि संपर्क कार्यालय या परिसरात कॅमेरे

पिंपरी : महपालिकेच्या खर्चाने वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा नगरसेवकांचा अट्टहास दिसून येतो. विशेष म्हणजे नगरसेवक स्वत:चे निवासस्थान आणि संपर्क कार्यालय या परिसरात कॅमेरे बसविण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलेले अनेक लोकप्रतिनिधी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. काही जण जमीन खरेदी-विक्री व्यवसायात सक्रिय आहेत. काही बांधकाम व्यावसायिक झाले आहेत. या व्यवसायात काम करताना, लँड माफिया, तसेच अनेकांशी त्यांचा संबंध येतो. गुन्हेगारीशी संबंधित काही नगरसेवक आहेत. अशा प्रकारे विविध क्षेत्रांत संबंध येत असल्याने अनेकांना स्वत:च्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागते. गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनानंतर नगरसेवक अविनाश टेकावडे यांचा खून झाला. टेकावडे यांच्या खुनाच्या घटनेनंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आपण करत असलेली चुकीची कामे कधीही अंगलट येऊ शकतात. कधीही, कोणीही हल्ला करू शकते. या भीतीने काही नगरसेवकांची गाळण उडाली आहे. जसजशी महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तशी त्यांची अधिक घाबरगुंडी उडू लागली असून, त्यांच्याकडून दक्षतेच्या अधिकाधिक उपाययोजना केल्या जात आहेत. एकीकडे छुप्या पद्धतीने गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग, तर दुसरीकडे लोकसेवक म्हणून समाजात वावरायचे, अशा दोन्ही भूमिका वठविण्याचा समतोल राखताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नगरसेवकांची दमछाक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकावर खुनी हल्ला झाला. त्या वॉर्डात नगरसेवकाने पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले होते. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होण्याच्या आगोदरच हल्ला केला. (प्रतिनिधी)झोपडपट्टीतील वॉर्डात हमखास सीसीटीव्हीपिंपरी आणि चिंचवडमधील झोपडपट्टी परिसरातील वॉर्डात प्रामुख्याने सीसीटीव्ही यंत्रणेचा आग्रह धरला जात आहे. झोपडपट्ट्यांमध्ये भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण अधिक असते. त्यावर नियंत्रण यावे, याकरिता सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचा आग्रह असतो. असे तेथील नगरसेवक सांगतात. काहींनी तर पालिकेतर्फे ही यंत्रणा कार्यान्वित होण्याची वाट न पाहता स्वखर्चाने ही यंत्रणा बसविण्यास प्राधान्य दिले आहे. हालचाल टिपण्यासाठी केला जातो वापरलोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरणारे स्वत:च्या संपर्क कार्यालयात मात्र चाहोबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावून बसतात. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची हालचाल टिपली जाते. त्यात कोणी संशयित वाटते का, यावर त्यांची आणि समर्थक कार्यकर्त्यांची नजर कायम भिरभिरत असते. संपर्क कार्यालयात बसून टेबलावरील संगणकाच्या स्क़्रीनवर कार्यालयाबाहेरील परिस्थिती पाहत असतात.