शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

जिल्हा परिषदेची बियाणे वाटप योजना ठरली बिनकामाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 12:39 IST

अकोला: अल्पभूधारक शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी व समाजकल्याण विभागाकडून बीटी कापूस बियाणे वाटपासाठी तरतूद केलेला निधी वित्त विभागाने आॅगस्टअखेर परत घेतला.

अकोला: अल्पभूधारक शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी व समाजकल्याण विभागाकडून बीटी कापूस बियाणे वाटपासाठी तरतूद केलेला निधी वित्त विभागाने आॅगस्टअखेर परत घेतला. त्यामुळे दोन विभागांचा ८५ लाख रुपये निधी अखर्चित आहे, तर महिला व बालकल्याण विभागातून बियाणे वाटपाला शासनाची मंजुरी न मिळाल्याने कागदावरच राहिलेल्या योजनेची ३२ लाखांची तरतूदही पडून आहे. या सगळ्या प्रकारातून शेतकºयांसाठी असलेली १ कोटी १७ लाख रुपयांची योजना बिनकामाची ठरली आहे.जिल्ह्यातील सर्वच समाज घटकातील शेतकºयांना केंद्रस्थानी ठेवून २०१८-१९ च्या खरीप हंगामात बीटी कापूस बियाणे वाटप योजना राबविण्याचे निर्देश भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले होते. त्यानुसार सर्वसाधारण गटातील शेतकºयांसाठी कृषी विभागात ४० लाख रुपये, समाजकल्याण विभागाला ४५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली. त्यातून प्रत्येक शेतकºयाला एक हेक्टरपर्यंत बीटी कापूस बियाण्यांचे पाच पॅकेट देण्याचे नियोजन केले. योजनेत प्रति लाभार्थी ३,७५० रुपये लाभ ठरवून देण्यात आला. त्यासाठी लाभार्थी निवड झाली. त्याचवेळी पेरणी आटोपली तरी तरतूद केलेला निधी आॅगस्ट अखेरपर्यंतही जिल्हा परिषदेतून पंचायत समित्यांमध्ये पोहोचलाच नव्हता. त्याचवेळी आॅगस्टअखेर निधी खर्चाचा हिशेब देऊन शिल्लक निधी परत करण्याचे पत्र वित्त विभागाने पंचायत समित्यांना दिले. त्या पत्रानुसार पंचायत समित्यांनी निधी परत केला. त्याशिवाय, महिला शेतकºयांसाठी महिला व बालकल्याण विभागाला दिलेला ३२ लाख रुपये निधी खर्च करण्यालाही शासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे शेतकºयांच्या मदतीची योजना कागदावरच राहिली.

- ‘डीबीटी’च्या गोंधळाने घेतला योजनेचा बळी!राज्याच्या नियोजन विभाग, त्यानंतर कृषी व पशुसंवर्धन विभागाने शेतीसंदर्भातील निविष्ठांचा लाभ देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार बियाणे वाटप योजना राबवावी लागत आहे. त्यातील जाचक अटींनी लाभार्थींची कटकट वाढविली. त्यानुसार खरेदी प्रक्रियेत शेतकºयांनी त्यांच्या खात्यातून देयकाची रक्कम अदा करणे, त्याचा बँकेतून व्यवहार झाल्याचा पुरावा, जीएसटी कपातीसह देयकाची प्रत, कर्मचारी-अधिकाºयांनी लाभाची वस्तू घेतल्याची केलेली पडताळणी यासह अनेक डोकेदुखी ठरणाºया अटींचा समावेश आहे. त्यामुळे लाभार्थींच्या पदरात बियाण्यांची रक्कम पडणारच नाही, ही बाब ‘लोकमत’ने आधीच मांडली होती.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद