शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांचा अखर्चित निधी होणार शासनजमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 01:32 IST

अमरावती विभागातील पाच जिल्हा परिषदांकडील निधीचा समावेश

संतोष येलकर / अकोलाजिल्हा परिषदांकडील आस्थापना व आस्थापनेत्तर अखर्चित निधी शासन खाती जमा करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत १३ मे रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. त्यानुसार अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांचा अखर्चित निधी शासनाकडे जमा करण्यात येणार आहे.राज्य विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने साक्षीच्या वेळी निधी खर्च न करणार्‍या व अखर्चित रक्कम शासनाच्या खात्यात जमा न करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांकडील अखर्चित निधी शासनाच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना ग्राम विकास विभागामार्फत परिपत्रकाद्वारे राज्यातील जिल्हा परिषदांना दिल्या आहेत. त्यानुसार शासनाच्या संबंधित विभागाकडून जिल्हा परिषदांना प्राप्त झालेला आस्थापनाविषयक अखर्चित निधी तातडीने शासनाच्या खात्यात जमा करावा लागणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वेतनाचा निधी, निरंतर पाणीपुरवठा व समाजकल्याण विभागाकडून प्राप्त आस्थापनाविषयक निधीचा समावेश आहे तसेच जिल्हा परिषदांना विविध योजना राबविण्यासाठी प्राप्त झालेला निधी त्या आर्थिक वर्षात खर्च झाला नसल्यास, अखर्चित निधी पुढील आर्थिक वर्षात खर्च करण्यास मान्यता आहे; परंतु संबंधित निधी लगतच्या वर्षीही खर्च झाला नाही, असा अखर्चित निधी शासनाच्या संबंधित विभागाकडे तातडीने जमा करण्याच्या सूचना शासनामार्फत जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांकडील अखर्चित निधी शासनाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.