शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

जिल्हा परिषदेचे २३ शिक्षक बडतर्फ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:17 IST

अकोला : जिल्हा परिषदेत राखीव जागांवर नियुक्ती मिळाल्यानंतर जातवैधता सादर न करणार्‍या ४४ पैकी २३ शिक्षकांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत. त्याचवेळी आंतरजिल्हा बदलीने राखीव जागेवर पदस्थापना मिळालेल्या १२ शिक्षकांना परत मूळ जिल्हय़ात पाठविले जाणार आहे, तर नऊ शिक्षकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला.

ठळक मुद्दे१२ शिक्षक मूळ जिल्हय़ात जाणार नऊ शिक्षकांचा निर्णय प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेत राखीव जागांवर नियुक्ती मिळाल्यानंतर जातवैधता सादर न करणार्‍या ४४ पैकी २३ शिक्षकांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत. त्याचवेळी आंतरजिल्हा बदलीने राखीव जागेवर पदस्थापना मिळालेल्या १२ शिक्षकांना परत मूळ जिल्हय़ात पाठविले जाणार आहे, तर नऊ शिक्षकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला.  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आस्थापनेची संवर्गनिहाय बिंदूनामावली २00७ मध्ये तयार करण्यात आली. त्या बिंदूनामावलीत प्रचंड गोंधळ करण्यात आला. ती अंतिम करण्यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयातील मागास वर्ग कक्षाने अनेक आक्षेप नोंदविले. त्यामध्ये आतापर्यंत अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-अ, भज-ब, भज-ड, इतर मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गात सरळ सेवेने किंवा पदोन्नती दिलेल्या कर्मचार्‍यांच्या नियुक्तीसंदर्भात निवड समितीने केलेल्या प्रवर्गनिहाय याद्या, नियुक्ती आदेश, जातवैधता प्रमाणपत्र, तसेच आंतरजिल्हा बदलीने नियुक्ती आदेश, एसटीच्या पदावर गैरआदिवासी कर्मचार्‍यांची नियुक्ती, ज्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचार्‍यांनी जातवैधता सादर केली नाही, १५ जून १९९५ नंतर विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना एसटी प्रवर्गात नियुक्ती दिली. त्यांच्या सेवा समाप्त करणे, या सगळ्या गंभीर प्रकारांची संपूर्ण माहिती तसेच जातवैधता प्रमाणपत्र न घेताच नियुक्ती देणार्‍या सर्व संबंधितांवर कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश ६ जुलै २0११ रोजी देण्यात आला. त्यावरही कोणावरच कारवाई झाली नाही. त्यानंतर ८ जुलै २0११ रोजी विधिमंडळाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती कल्याण समितीने या गंभीर प्रकाराची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले; मात्र कारवाईस प्रचंड दिरंगाई करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जानेवारी २0१७ मध्ये जिल्हय़ातील १४७ शिक्षकांना गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत नोटीस बजावल्या. त्यापैकी ४४ शिक्षकांनी संधी देऊनही जातवैधता सादर केली नाही. त्यांच्यावर अंतिम कारवाईचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सादर केला. त्यापैकी अकोला जिल्हा परिषदेत नियुक्त २३ शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शुक्रवारी दिले. आंतरजिल्हा बदलीने राखीव जागांवर रुजू झाल्यानंतर जातवैधता न देणार्‍या १२ शिक्षकांना मूळ जिल्हय़ात परत पाठविले जाईल. 

वरिष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचारीही जबाबदारजातवैधता प्रमाणपत्र न घेताच नियुक्ती देणे, आंतरजिल्हा बदलीने नियुक्ती देताना रोस्टरकडे दुर्लक्ष करणे, यासारख्या गंभीर प्रकारांना शिक्षण विभागातील तत्कालीन अधीक्षक, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. मुख्यत्वे जबाबदार असलेले संबंधित वरिष्ठ सहायक आर.एन. नकासकर, आर.एस. गोपनारायण, कनिष्ठ सहायक पी.पी. लावंड यांनाही आधीच कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या आहेत. त्यांच्यावरही आता कारवाईची टांगती तलवार आहे.

उर्दू  माध्यमांच्या १0 शिक्षकांवरही कारवाईशिक्षण विभागाने अंतिम कारवाईसाठी प्रस्ताव सादर करताना मराठी माध्यमांच्या ४४ शिक्षकांसोबतच १0 उर्दू माध्यमातील शिक्षकांचाही समावेश आहे. त्यापैकी किती शिक्षकांवर कारवाईचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले, याबाबतची माहिती पुढे आलेली नाही. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी कारवाई झाल्याचे आदेश अद्याप पोहचलेच नसल्याचे सांगितले.