शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचारी भरती शासनच करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:09 IST

अकोला : जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचार्‍यांच्या रिक्त  पदांची भरती आता शासनाकडूनच केली जाणार आहे.  जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समि तीऐवजी शासन ऑनलाइन परीक्षेतून ही निवड करणार आहे.  त्याचवेळी इतर विभागाची भरती या समितीकडून केली जाणार  आहे. 

ठळक मुद्देजिल्हा निवड समितीऐवजी ऑनलाइन परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचार्‍यांच्या रिक्त  पदांची भरती आता शासनाकडूनच केली जाणार आहे.  जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समि तीऐवजी शासन ऑनलाइन परीक्षेतून ही निवड करणार आहे.  त्याचवेळी इतर विभागाची भरती या समितीकडून केली जाणार  आहे. जिल्हा परिषदेत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील  पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात  येते. त्यासाठी संबंधित जिल्हय़ाच्या जिल्हाधिकार्‍यांना अध्यक्ष या  नात्याने बराच वेळ देत श्रम करावे लागतात. त्याचा परिणाम इतर  कामांवर होतो. त्यामुळे जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील  कर्मचार्‍यांची भरती ऑनलाइन करण्याची तयारी शासनाने केली.  त्यानुसारच २४ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयात जिल्हा निवड  समितीकडून ही निवड प्रक्रिया काढून घेण्यात आली.यापुढे उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी राज्य स् तरावर तयार होणार आहे. त्यासाठी अर्ज करताना उमेदवारांना  कोणत्या जिल्हय़ात नियुक्ती हवी आहे, त्यासाठी १ ते ३४ जिल्हा  परिषदांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्यातून निवड झालेल्या  उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी त्या उमेदवारांच्या मूळ  जिल्हय़ातील मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. पात्र ठरलेल्या  उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे तसेच गुणानुसार  जिल्हानिहाय नियुक्ती दिली जाणार आहे.