शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या विशेष सभेचे २0 ठराव कायम!

By admin | Updated: March 22, 2016 02:19 IST

विभागीय आयुक्तांचा आदेश; ‘कोंबडी’ योजनेसह दोन ठराव निलंबित.

अकोला: जिल्हा परिषदेच्या गत २६ फेब्रुवारी रोजीच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आलेले २२ पैकी २0 ठराव कायम ठेवण्यात येत असून, कोंबडी वाटप योजनेसह दोन ठराव निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी १८ मार्च रोजी दिला. गत २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत विविध २२ विषयांना मंजुरी देण्यात येत असल्याचे ठराव मंजूर करण्यात आले; परंतु विशेष सभेत मंजूर करण्यात आलेले २२ ठराव बेकायदशीर पारित करण्यात आले. त्यामुळे पारित करण्यात आलेले बेकायदेशीर ठराव खारीज करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन टाले (देशमुख) यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत केली होती. या प्रकरणात गत आठवड्यात विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान, याचिकाकर्ते सदस्य नितीन देशमुख तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई आणि सभेचे सचिव तथा जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. आर. तापी यांचे म्हणणे नोंदविण्यात आले. तिन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर, २६ फेब्रुवारी रोजीच्या जिल्हा परिषद विशेष सभेत पारीत करण्यात आलेले विषय क्रमांक २0 व २१ बाबतचे ठराव वगळता पारित करण्यात आलेले इतवृत्तासह इतर सर्व २0 ठराव जनहित लक्षात घेता, कायम ठेवण्यात येत असून, विषय क्रमांक २0 व २१ बाबतचे ठराव निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी १८ मार्च रोजी दिला. विशेष सभेत पारित करण्यात आलेल्या विषय क्र. २0 व २१ वगळता इतर सर्व विषयांबाबत ठरावांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, असा आदेशही विभागीय आयुक्तांनी दिला आहे. विभागीय आयुक्तांनी निलंबित केलेल्या दोन ठरावांपैकी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या कुक्कुटपालन (कोंबडी) वाटप योजनेबाबत ठरावांचा समावेश आहे.