शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशासाठी जिल्हा परिषद शाळांनी कसली कंबर

By admin | Updated: April 24, 2017 02:01 IST

पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न: गावोगावी शिक्षकांची पायपीट

अकोला : खासगी शाळांनी जिल्हा परिषद शाळांसमोर निर्माण केलेले आव्हान जि.प. शाळांनी स्वीकारले असून, विद्यार्थी व पालकांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी विविध प्रयोग राबविणे सुरू केले आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून योग्य शिक्षण मिळत नाही, असा सार्वत्रिक समज झाल्याने की काय, खासगी इंग्रजी शाळांचे पीक सध्या जोमाने पसरले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या शाळांनी कंबर कसली आहे. त्याचा सकारात्मक परिणामदेखील जाणवू लागला आहे.महागडी फी, वेगळ्या धाटणीचा ड्रेस, पायमोजे व बूट, स्कूल बस, आकर्षक स्कूल बॅग, सोबत जेवणाचा डबा, बसपर्यंत सोडणे व घ्यायला जाणे हे पालकांना लागलेले जास्तीचे काम, असे चित्र आता ग्रामीण भागातदेखील पाहावयास मिळते आहे. अभिमानाने पालक सांगतो, की माझा मुलगा-मुलगी इंग्लिश मीडियममध्ये जातो. घरी आई-वडील इंग्रजी बोलत नसतील; पण पाल्य मोडकी-तोडकी इंग्रजी बोलताना व गाणी गाताना पाहून पालकांना खूप समाधान मिळते. त्यामुळे मोठे काबाडकष्ट करून प्रत्येक पालकाला अशा शाळेत मुलांना पाठविण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांतील पटसंख्या कमी कमी होतानाचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आपल्याकडे वळविण्याच्या प्रचार-प्रसाराचा अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. खासगी शाळा सर्व दृष्टीने कशी उत्तम आहे, असा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. १५ मार्चपासून जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, नाही फी, नाही प्रवास, मोफत शिक्षणातून सर्वांगीण विकास, असा प्रचार करून शाळांकडून पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालकांचा इंग्रजीकडे जास्त कल असल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे अध्यापन सुरू केले आहे. बदललेल्या वातावरणामुळे पालक जिल्हा परिषदांच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यास उत्सुक आहेत. यासोबतच जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण महोत्सव, बाल आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजन अशा अनेक विविध उपक्रमांची जाहिरात प्रत्येक गावातून करण्यात येत आहे.कृतीमधून अध्ययन ही नवी शिक्षण पद्धत सध्या सुरू झाली आहे. अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. यापूर्वी खासगी शाळांप्रमाणे जि.प. शाळांची जाहिरात होत नव्हती; मात्र आता शिक्षण विभागाने कात टाकली आहे.