शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या रिक्त जागांचे आरक्षण जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST

अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासर्व प्रवर्गाच्या (ओबीसी) जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ जागा रिक्त ...

अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासर्व प्रवर्गाच्या (ओबीसी) जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ जागा रिक्त जागा झाल्या असून, रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने रिक्त जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार, २३ मार्च रोजी काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आणि पंचायत समित्यांच्या रिक्त जागांचे आरक्षण जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या रिक्त १४ जागांपैकी ७ जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव जाहीर करण्यात आल्या.

गतवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत देण्यात आलेले प्रवर्गनिहाय आरक्षण ५० टक्क्यापेक्षा जास्त झाल्याने, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आलेल्या संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करुन, पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ५ मार्च रोजी दिला. त्यानुसार ‘ओबीसी’ प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांचे आणि जिल्ह्यात सात पंचायत समित्यांच्या २८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या रिक्त १४ जागा आणि सात पंचायत समित्यांच्या रिक्त २८ जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत २३ मार्च रोजी काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या रिक्त १४ जागांपैकी ७ जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर करण्यात आल्या असून, उर्वरित ७ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त २८ जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत सातही तहसील कार्यालयांमध्ये जाहीर करण्यात आली.

जि.प.च्या १४ जागांचे गट व

प्रवर्गनिहाय असे आहे आरक्षण!

गट प्रवर्ग

दानापूर सर्वसाधारण

अडगाव बु. सर्वसाधारण स्त्री

अकोलखेड सर्वसाधारण

तळेगाव बु. सर्वसाधारण स्त्री

कुटासा सर्वसाधारण स्त्री

लाखपूरी सर्वसाधारण

बपोरी सर्वसाधारण स्त्री

घुसर सर्वसाधारण

कुरणखेड सर्वसाधारण

कानशिवणी सर्वसाधारण स्त्री

अंदुरा सर्वसाधारण स्त्री

देगांव सर्वसाधारण

दगडपारवा सर्वसाधारण स्त्री

शिर्ला सर्वसाधारण

इश्वर चिठ्ठीने अंदूरा, कानशिवणी

सर्वसाधारण महिलांसाठी राखीव!

जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षण सोडतमध्ये अंदुरा, कानशिवणी व घुसर या तीन जागांसाठी इश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये इश्वर चिठ्ठीने अंदूरा व कानशिवणी या दोन जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव जाहीर करण्यात आल्या.