शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक: बंडोबा थंडोबा होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 10:42 IST

काही गटात स्वपक्षाच्या उमेदवारालाच आव्हान उभे केल्याने मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांच्यात कोणता समझोता घडवून आणता येईल, यावरही चर्चा सुरूच राहणार आहे.

अकोला: जिल्हा परिषदेत सत्तेसाठी प्रबळ दावेदार भारिप-बमसंच्या अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष तर काहींनी थेट इतर पक्षांची उमेदवारी मिळवली. त्यामध्ये अनेक पदाधिकारीही आहेत. त्याचवेळी काही मतदारसंघात पक्षाने पार्सल उमेदवार दिले. त्या ठिकाणी स्थानिकऐवजी पार्सल उमेदवारांचा मुद्दा चांगलाच गाजत असल्याने संबंधितांच्या नाकीनऊ आले आहेत. भारिप-बमसंच्या उमेदवारांसमोर पक्षातील बंडखोरांचा सामना करण्याची वेळ आली. त्यांचे बंड शमवण्यासाठी पक्षाने माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे यांच्यावर जबाबदारी दिली. अपक्ष उमेदवार या समितीच्या मनधरणीला किती महत्त्व देतात, यावरच त्यांची उमेदवारी अवलंबून आहे. त्याशिवाय, काही गटात स्वपक्षाच्या उमेदवारालाच आव्हान उभे केल्याने मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांच्यात कोणता समझोता घडवून आणता येईल, यावरही चर्चा सुरूच राहणार आहे.महाविकास आघाडीतही धुसफूसकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची जिल्हा परिषदेत आघाडी स्थापन झाली नाही. त्याचवेळी मूर्तिजापूर तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट शिवसेनेसाठी सोडण्यात आले. आता त्याच तालुक्यातील इतर गटात या पक्षांचे उमेदवार परस्परविरोधी रिंगणात आहेत. त्यापैकी कोण उमेदवारी मागे घेते, यावरच महाआघाडीचे सामंजस्य दिसून येणार आहे.भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर येत्या १ जानेवारीपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात; मात्र इतर पक्षातून लढणाºया उमेदवारांचे आव्हान कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद