शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

ठरलेल्या आरक्षणानुसारच होणार जिल्हा परिषदेची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 10:50 IST

जिल्हा परिषदेच्या ५३ गटांच्या आरक्षणात सर्वसाधारणसह आरक्षित प्रवर्गातील महिलांसाठी ५३ पैकी २७ गट राखीव आहेत.

- सदानंद सिरसाटअकोला: जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना, गट, गणांचे आरक्षण, जागांची संख्या मे २०१९ मध्येच निश्चित करण्यात आली. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया होत आहे. त्याचा फटका गेल्या काळात जिल्हा परिषदेच्या सभागृहात असलेल्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनाही बसला आहे. आता त्यांना नव्या खेळीतून सभागृह गाठावे लागणार किंवा कुटुंबातील इतर व्यक्तिला पुढे करावे लागणार आहे.जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित जागांची संख्या, गट, गण मे महिन्यातच निश्चित करण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी ५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (नामाप्र) १४ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ गट आहेत. जिल्हा परिषदेच्या ५३ गटांच्या आरक्षणात सर्वसाधारणसह आरक्षित प्रवर्गातील महिलांसाठी ५३ पैकी २७ गट राखीव आहेत.

- जिल्हा परिषद गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण!अनुसूचित जाती गट : सर्वसाधारण - उगवा, वरुर, राजंदा,भांबेरी, कान्हेरी सरप, सस्ती. स्त्रीयांसाठी राखीव- व्याळा, पारस, हातरुण, चांदूर, बोरगावमंजू, हातगाव.अनुसूचित जमाती गट : सर्वसाधारण - पिंपळखुटा, जनुना. स्त्रीयांसाठी राखीव- अकोली जहागीर, महान, आगर.नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण - अकोलखेड, लाखपुरी, घुसर, कानशिवणी, अंदुरा, देगाव, शिर्ला. स्त्रीयांसाठी राखीव - दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., कुटासा, बपोरी, कुरणखेड, दगडपारवा.

- गटांतून विस्थापित झालेले पदाधिकारीगट राखीव झाल्याने निवडणूक प्रक्रियेतून विस्थापित झालेल्यांमध्ये प्रमुख दहा पदाधिकारी आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शरद गवई, माजी उपाध्यक्ष गुलाम नबी हुसेन देशमुख, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी सभापती माधुरी गावंडे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, माजी सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, द्रोपदा वाहोकार या पदाधिकाऱ्यांना विस्थापित व्हावे लागत आहे. त्याशिवाय, माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते रमण जैन, गोपाल कोल्हे, सम्राट डोंगरदिवे, प्रतिभा अवचार, ज्योत्स्ना चोरे, चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनाही त्यांच्या गटांतून धक्का बसला.

- अध्यक्षपदासाठी अनेक उतरणार रिंगणातजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वांसाठी खुले असल्याने त्यासाठी आता अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यापैकी जिल्हा परिषदेची सत्ता गाजवलेल्यांमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, माजी कृषी सभापती राजू बोचे, सेवकराम ताथोड यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागत आहे. तर माजी उपाध्यक्ष सुभाष रौंदळे, गजानन पुंडकर, माजी सदस्य प्रदीप वानखडे, शोभा शेळके यांना त्यांच्याच गटात संधी आहे. निवडणुकीच्या आरक्षण प्रक्रियेत अकोला तालुक्यातील आगर गटातून शिवसेनेचे महादेव गवळे, घुसर गटातून भाजपच्या निकिता रेड्डी, उगवा गटातून भाजपच्या पद्मावती भोसले, चिखलगावातून संतोष वाकोडे यांना धक्का बसला. पारसमधून रामदास लांडे, अंदुरामधून सुनीता गोरे, निमकर्दामधून विलास इंगळे, अकोली जहागीरमधून अपक्ष ज्योत्स्ना बहाळे, पिंजरमधून अक्षय लहाने, जनुनातून गीता राठोड यांच्यासह इतरही सदस्यांना त्यांच्या हक्काच्या गटातून विस्थापित व्हावे लागले आहे. 

- राजकारणात महिलांना पुढे आणण्याची संधीकाही पदाधिकारी, सदस्यांना त्यांच्याऐवजी पत्नीला राजकारणात आणण्याची संधी महिलांसाठी राखीव गटांमुळे उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये विद्यमान उपाध्यक्ष, सभापती अरबट, भाजपचे जैन, अक्षय लहाने, सम्राट डोंगरदिवे, गोपाल कोल्हे यांच्या कुटुंबातून महिला सदस्य पुढे येऊ शकतात. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूक