शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक : छाननीत १२१४ उमेदवारांचे १३११ अर्ज वैध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:00 IST

जिल्हा परिषदेसाठी ७ उमेदवारांचे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ५१२ उमेदवारांचे ५७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले.

अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार, २४ डिसेंबर रोजी करण्यात आली. छाननी प्रक्रियेत १३ उमेदवारांचे १७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, जिल्ह्यात १ हजार २१४ उमेदवारांचे १ हजार ३११ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ७ उमेदवारांचे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ५१२ उमेदवारांचे ५७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले. सातही पंचायत समित्यांसाठी ६ उमेदवारांचे ७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ७०२ उमेदवारांचे ७३८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ५१९ उमेदवारांनी ५८३ अर्ज दाखल केले, तर सात पंचायत समित्यांसाठी ७०८ उमेदवारांनी ७४५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात आली. छाननी प्रक्रियेत जिल्हा परिषदेसाठी ७ उमेदवारांचे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ५१२ उमेदवारांचे ५७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले. सातही पंचायत समित्यांसाठी ६ उमेदवारांचे ७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ७०२ उमेदवारांचे ७३८ उमेदवारी अर्ज वैध ठरले. छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूक