शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसींसाठी आरक्षित!

By admin | Updated: June 11, 2016 02:59 IST

आरक्षण सोडत जाहीर : राजकीय मोर्चेबांधणीला येणार वेग.

अकोला: राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण शुक्रवारी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित करण्यात आले. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्याने, पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नवीन अध्यक्षाच्या निवडीकरिता जिल्हा परिषदेतील राजकीय मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. जिल्हा परिषदांच्या विद्ममान अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांचा अडीच वर्षांंचा कालावधी येत्या ३0 जून रोजी संपत आहे. त्यानुषंगाने पुढील अडीच वर्षांंच्या कालावधीसाठी नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांची निवड करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर शुक्रवारी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद अध्यक्षपदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित करण्यात आले. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने ३0 जून रोजी जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. पुढील अडीच वर्षांंच्या कालावधीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षांसह, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या नवीन सभापतींची निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेतील विद्ममान सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघासह काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला गती मिळणार आहे. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या समीकरणामध्ये राजकीय पक्षांच्या सदस्यांसह अपक्ष सदस्यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असे आहेत अध्यक्षपदाचे दावेदार ! जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित झाल्याने, या प्रवर्गातील जिल्हा परिषद सदस्यांच्या नावांची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली. त्यामध्ये प्रामुख्याने भारिप-बमसंचे गोपाल कोल्हे, विजय लव्हाळे, शोभा शेळके,संध्या वाघोडे, अनिता आखरे, देवका पातोंड, देवानंद गणोरकर, संजय आष्टीकर, भाजपचे गजानन उंबरकर, माया कावरे, अक्षय लहाने आणि शिवसेनेचे चंद्रशेखर पांडे गुरुजी व ज्योत्स्ना चोरे आदी सदस्य जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.