शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

युवकांच्या आत्महत्या चिंताजनक

By admin | Updated: August 10, 2014 00:20 IST

चिंतनाची गरज : जास्त प्रमाण १८ ते ३५ वयोगटातील

खामगाव : जीवनामध्ये आलेली निराशा, वैफल्यग्रस्त जीवन, तसेच घरातील छोटे मोठे वाद, मित्रांशी भांडणे, परिक्षेत अपयश अशा विविध कारणावरुन समाजात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात खामगाव येथील सामान्य रुग्णालयात अशा आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या ४३0 जणांवर उपचार करण्यात आले. यामध्ये ७0 टक्के प्रमाण हे १८ ते ३५ वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे.समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला कुटूंबासोबतच बाहेरही सर्वांसोबत संबंध प्रस्थापित करावे लागतात. तसेच आयुष्याच्या अखेरचे दिवस सुखात जाण्यासाठी माणूस प्रयत्नरत असतो. सध्याच्या संगणकाच्या युगात तर प्रत्येकजण आधुनीक तंत्रज्ञानाशी जुळला आहे. जीवनाच्या या वाटेवर मात्र प्रगतीकडे असताना अपयश, छोट्या मोठय़ा कारणावरुन कुटूंबातील सदस्यांशी वाद, प्रेयसी वा प्रियकराकडून झालेल्या प्रेमभंग, शैक्षणिक घसरण यामुळे जीवनात निराशा प्राप्त होते. माणसातील समजुतदारपणा कमी झाल्यामुळे तो आयुष्याला कंटाळून या अख्या जगाचा निरोप घ्यायचा म्हणून आत्महत्येचा मार्ग पत्करतो. जीवनात यापुढे अंधकारमय वातावरण असल्याचा त्याला भास होवून स्वत:चे आयुष्य संपविण्याचे प्रयत्न होतात.खामगाव येथील सामान्य रुग्णालयात मार्च २0१३ ते जुलै २0१४ या कालावधीत तब्बल ४३0 जणांनी विषप्राशन तसेच अन्य मार्गाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये १३२ महिला तर २९८ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केलेला ४३0 जणांपैकी ७0 टक्के प्रमाण हे १९ ते ३५ वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे. युवकांचा आत्महत्येकडे वाढलेला कल ही आज धक्कादायक बाब असून याला प्रतिबंध घालण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी पुढे येवून चिंतनाची गरज आहे.