शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डाबकी रोडवर युवकांचा धुडगूस

By admin | Updated: June 18, 2017 02:14 IST

डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेणुका नगरमध्ये गुंड प्रवृत्तीच्या ५0 ते ६0 युवकांनी धुडगूस घालत प्रचंड दगडफेक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेणुका नगरमध्ये गुंड प्रवृत्तीच्या ५0 ते ६0 युवकांनी धुडगूस घालत प्रचंड दगडफेक केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. प्रतीक कराळे नामक युवकाच्या पोटात चाकू भोसकण्यात आला असून, सदर युवकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रेणुका नगरमध्ये शनिवारी रात्री शिव नगर, भारती प्लॉट, राव नगर, फडके नगर, वानखडे नगरातील ५0 ते ६0 गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अचानक दगडफेक केली. त्यानंतर प्रतीक कराळे नामक युवकाच्या पोटात चाकू भोसकल्याने युवकाचा जीव धोक्यात आला आहे. अचानकच ५0 ते ६0 युवकांनी दगडफेक केल्याने यामध्ये दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका युवकाच्या मांडीवरही चाकू भोसकण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सदर दगडफेक आणि चाकू भोसकल्याचे एका सीसी क ॅमेर्‍यामध्ये कैद झाले असून, या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी डाबकी रोड पोलिसांनी शनिवारी रात्रीच हालचाली सुरू केल्या आहेत.दगडफेक सीसी कॅमेर्‍यात कैदपोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या एक ह्यसीसी कॅमेराह्ण आपल्या शहरासाठी या नवीन संकल्पनेला प्रतिसाद देत परिसरातील युवकांनी एकत्र येऊन रेणुका नगरमधील सावरकर चौकात सीसी कॅ मेरे लावले. हे कॅमेरे दोन दिवसांपूर्वीच कार्यरत केल्यानंतर शनिवारी या परिसरात दगडफेक करण्यात आली. ही दगडफेक या सीसी कॅमेर्‍यांमध्ये कैद झाली असून, आता पोलिसांनी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सावरकर चौकातील घाबरलेल्या नागरिकांनी केली आहे.