शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनाकरिता गेलेला युवक धरणात बुडाला

By admin | Updated: September 28, 2015 02:25 IST

पोपटखेड प्रकल्पावरील घटना.

आकोट (जि. अकोला): गणेश विसर्जनाकरिता गेलेला युवक पोपटखेड धरणात बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेने जिल्ह्यात विसर्जनाला गालबोट लागले. लोहारी मार्गावरील अहल्याबाई होळकर नगरातील गणेश मंडळाच्या गपणती मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता २७ सप्टेंबर रोजी भाविक पोपटखेड धरणावर गेले होते. गणेश मंडळातील सदस्यांसोबत सिद्धेश्‍वर मोहन इंगळे (२३) (रा.माटरगाव, जि. बुलडाणा) हा सुद्धा गेला होता. गणेश विसर्जनानंतर परत येताना सिद्धेश्‍वर इंगळे आढळून आला नाही. त्यामुळे तो धरणात बुडाला असावा, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके व पथक घटनास्थळावर दाखल झाले होते. सायंकाळपर्यंत सिद्धेश्‍वरला शोधण्यात यश आले नव्हते. बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील मूळचा रहिवासी असलेला सिद्धेश्‍वर इंगळे हा आकोट येथील एका खासगी फायनान्स कंपनीत आहे.