अकोला : मोटारसायकलने घरी जाणार्या युवकास तीन अनोळखी इसमांनी अडविले आणि त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील १५ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठय़ा, गळय़ातील चेन लुटून नेली. ही घटना बुधवारी रात्री १२.५५ वाजताच्या सुमारास खोलेश्वर रोडवरील सरकारी बगिच्याजवळ घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. कमला नेहरू नगरात राहणारा आशिष शंकरराव मांगरूळकर (२५) याने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास त्याच्या आजीला घेऊन मोटारसायकलने घरी जात असता, सरकारी बगिच्याजवळील गल्लीमध्ये तीन अनोळखी इसमांनी त्याला अडविले आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्याच्या दोन अंगठय़ा व सोन्याची चेन, असा एकूण ४0 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला आणि पळ काढला. आशिषच्या तक्रारीनुसार, कोतवाली पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३९४, ५0४, ३४१ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.
चाकूचा धाक दाखवून युवकास लुटले
By admin | Updated: April 17, 2015 01:54 IST