शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोहट्टाबाजार पोलीस चौकी समोर ठाणेदाराने युवकाला चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST

अकोटः अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी एका युवकाला चांगलाच चोप दिल्याची घटना २९ ...

अकोटः अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी एका युवकाला चांगलाच चोप दिल्याची घटना २९ मार्च रोजी चोहट्टाबाजार पोलीस चौकीसमोर घडली. दरम्यान या घटनेच्या अनुषंगाने दहीहांडा पोलिसांनी तीन फिर्यादीवरून गुन्हे दाखल केले आहेत. तर या घटनेतील युवकाने आपण फिर्याद देण्यासाठी गेलो असता नाहक मारहाण केल्याचा आरोप केला.

दहीहंडा पोलीस स्टेशनचे चोहट्टाबाजार येथे अकोट येथील एम एच २७ बीई ४५७४ क्रमांकाचे मारुती स्विफ्ट डिझायर या गाडीला दुचाकीने धडक दिली. ही माहिती गाडीचे मालक चेतन धनराज भोयर यांना गाडी चालकाने दिली. त्यामुळे भोयर हे स्वतः चोहट्टाबाजार चौकीमध्ये आले असता रिपोर्ट कशासाठी देतो तुझा रिपोर्ट घेत नाही या कारणावरुन वाद घालत शिवीगाळ करीत ठाणेदार प्रकाश अहिरे व बीट जमादार भटकर यांनी मारहाण केल्याचे भोयर यांनी म्हटले आहे. या सर्व घटनेत पोलिसांनी तीन फिर्याद दाखल करुन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये

भोयर यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीला धक्का मारुन चालकास शिवीगाळ केल्याच्या चालक अभिजित घुले यांच्या फिर्यादीवरुन अकोला येथील सौरभ उत्तम सुरळकर यांच्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला. तर अकोला येथील युवकांचे फिर्यादीवरुन अभिजित घुले यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हा दाखल केला. तर दहीहांडा पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल करीत परस्पर विरोधी तक्रार दाखल करणारे लोकांनी गोंधळ घातल्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची पोलिसांची माहिती आहे.

कोट...

काल घडलेल्या अपघात प्रकरणावरुन परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल केले. तसेच पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल करीत गोंधळ घालणारे दोन्ही पार्टीतील आठ लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. आरोपींना आमच्या ताब्यात द्या यावरून पोलीस चौकीमध्ये गोंधळ घातला. शेवटी पोलिसांवर अरेरावी करीत असल्याने कायदा व सुव्यवस्था दृष्टीने अवाजवी बळाचा वापर करणे गरजेचे होते.

- प्रकाश अहिरे, ठाणेदार पोलीस स्टेशन दहीहांडा