शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लग्न तुटल्यामुळे युवकाने धमकावले; युवतीची आत्महत्या

By admin | Updated: July 12, 2017 01:24 IST

दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल: आरोपीस अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लग्न तुटल्यामुळे युवकाने धमकावल्यामुळे पूर्वाश्रमीची प्रेयसी असलेल्या युवतीने आत्महत्या केल्याची घटना १५ मे रोजी घडली होती. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी तपासाअंती दोन महिन्यानंतर युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भौरद येथील अनंता भगवान गावंडे याचे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे राहणाऱ्या एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने युवतीला लग्नाचे आमिषसुद्धा दाखविले होते. दरम्यान, युवकाचे लग्न जुळले. लग्नाची तयारी झाली; परंतु अनंताच्या प्रेमसंबंधाची माहिती झाल्यामुळे मुलीकडच्या नातेवाइकांनी लग्न मोडले. ठरलेले लग्न आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीमुळेच तुटले, असा संशय अनंता गावंडे याला आला. त्याने प्रेयसीला फोन करून जाब विचारला आणि तिला धमकावले. तिने त्याला आपण सांगितले नसल्याचे सांगत, समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु अनंताने तिच्यावर आरोप केल्यामुळे युवतीने १५ मे २0१७ रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला. तपासाअंती अनंता गावंडे याने दिलेल्या धमकीमुळे युवतीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने, डाबकी रोड पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी भादंवि कलम ३0६ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील करीत आहेत.