गांधीग्राम/दहिहंडा (अकोला): एका अनोळखी युवकाचा खून करून मृतदेह नदीपात्रात टाकून दिल्याची घटना रविवारी सकाळी उजेडात आली. याप्रकरणी दहिहंडा पोलिसांनी भादंविचे कलम ३0२ (खून) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नदीपात्राजवळ रविवारी काही महिलांना एक युवक जखमी अवस्थेत आढळला. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी ही माहिती दहिहंडा पोलिसांना कळविली. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविला. या युवकाच्या उजव्या हातावर ह्यशैलेशह्ण असे नाव गोंदले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला.
युवकाचा खून; मृतदेह टाकला नदीत
By admin | Updated: February 29, 2016 02:28 IST