शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांविरुद्ध तक्रार करणा-यांमध्ये युवक आघाडीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2016 21:03 IST

तक्रारदार युवकांचे प्रमाण ३६ टक्के.

नितीन गव्हाळे/अकोला: गत वर्षभरापासून लाचखोरांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई आणि सोबतच जनजागृतीही करण्यात येत असल्याने, लाचखोरांविरुद्ध तक्रारींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या तक्रारी करणार्‍यांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गतवर्षी २६ ते ३५ वर्षे वयोगटातील ३६१ युवकांनी लाचखोरांविरुद्ध तक्रारी नोंदविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालामध्ये म्हटले आहे. शासनाकडून भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने जनजागृती सुरू असते. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेसुद्धा कामामध्ये गती आणत, कारवाया वाढविल्या आहेत. २0१४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२४५ लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या, तर २0१५ मध्ये १२३४ लाचखोरांना गजाआड केले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे. आपल्या तक्रारींमधून तरुणाईची भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची वृत्ती दिसून येत आहे. २0१४ मध्ये लाचखोरांविरुद्ध तक्रार करणार्‍या युवकांची संख्या ३३८ होती, तर गतवर्षी २0१५ मध्ये त्यात आणखी वाढ झाली. २0१५ मध्ये ३६१ युवकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी नोंदविल्या. वृद्धांमध्ये मात्र लाचखोरांविरुद्ध तक्रारी करण्याबाबत उदासीनता दिसून येते. वृद्धांचे तक्रार करण्याचे प्रमाण केवळ पाच टक्के आहे. २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या युवकांमध्येही तक्रार करण्याचे प्रमाण १२ टक्के एवढे लक्षणीय असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालामध्ये म्हटले आहे. तक्रारदारांची वयानुसार वर्गवारी वय                 तक्रारदार २५ वर्षांपेक्षा कमी                  ११६२६ ते ३५ वर्षे                        ३६१३६ ते ४५ वर्षे                        २७८४६ ते ६0 वर्षे                        १८९६0 वर्षांपेक्षा अधिक                ४७