शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार रुपयांची खंडणी मागणारा युवक गजाआड

By admin | Updated: December 30, 2014 01:12 IST

युवकास गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी.

अकोला: आंबेडकरनगरात राहणारा भज्जन रमेश तायडे याने जबरदस्तीने पाच हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि खंडणी न दिल्यामुळे संतप्त होऊन तक्रारदाराचे कार्यालय पेटवून दिले. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी सोमवारी दुपारी आरोपी भज्जन तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कैलास टेकडीतील समतानगरात राहणारा मंगेश दिगंबर अहिर (३0) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते महसूल कॉलनीमधील महसूल कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या उत्कर्ष इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीचे शाखा प्रबंधक आहेत. ११ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान आंबेडकर नगरात राहणारा भज्जन रमेश तायडे हा त्याच्या काही सहकार्‍यांना घेऊन कंपनीच्या कार्यालयात गेला आणि या ठिकाणी त्याने मंगेश अहिर यांच्याकडे श्रामणेर शिबिरासाठी देणगीची मागणी केली. अहिर यांनी ५00 रुपये देण्याची तयारी दाखवली. तथापि, भज्जनने ही रक्कम घेण्यास नकार देत, त्यांना पाच हजार रुपयांची मागणी केली. ही मागणी अहिर यांनी फेटाळून लावल्याने संतप्त झालेल्या भज्जनने त्यांना शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी देण्यासोबतच कार्यालय जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर रविवारी अहिर यांच्या कार्यालयाला अचानक आग लागली. आगीत त्यांचे कार्यालय जळून खाक झाले. त्यामध्ये दोन लाख रुपयांचे साहित्य जळाले. सिव्हिल लाइन पोलिसांनी भज्जनविरुद्ध भादंविचे कलम ३८५, ४३६ नुसार गुन्हा दाखल केला.