तेल्हारा(जि. अकोला), दि. १५ : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या थार येथील ३0 वर्षीय युवकाचा गणेश विसर्जन करताना बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. थार येथील प्रदीप फोकमारे हे संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथील वान नदीत गणेश विसर्जन करण्यासाठी गेले होते. नदीत गणेश विसर्जन करताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांचा पाय घसरल्याने ते खोल पाण्यात गेले व बुडायला लागले. तेथे उपस्थित लोकांच्या निदर्शनात येताच त्यांनी प्रदीप फोकमारे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. बुडाल्याने प्रदीप फोकमारे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व आप्त परिवार आहे.
गणेश विसर्जन करताना युवकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2016 03:15 IST