शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

नागद येथील पूर्णा नदीत युवक वाहून गेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:28 AM

Youth drowned in Purna river निशांत गंगाराम मोर्डे(२२) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

लोहारा: बाळापूर तालुक्यातील नागद येथील युवक शेतात जात असताना युवकाचा पाय घसरून तोल जाऊन नदीत पडल्याने तो वाहून गेल्याची घटना ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.स्थानिक रहिवासी निशांत गंगाराम मोर्डे(२२) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. हा युवक ९ आॅक्टोबर रोजी सकाळी शेतात कामाला जात असताना, त्याचा पाय घसरून तो नदी पात्रात कोसळला. नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने तो युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच उरळचे ठाणेदार विलास पाटील घटनास्थळी पाहोचले. त्यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण केले. पथकासह ग्राम प्रशासन व नागरिकांनी नदी परिसरात शोध मोहीम सुरू केली; परंतु युवक सापडला नाही. सायंकाळी अंधार झाल्याने शोध मोहिमेत अडचण निर्माण झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. शनिवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात येणार असल्याचे संत गाडगेबाबा बचाव पथकाचे अंकुश सदाफळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPurna Riverपूर्णा नदी