शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चोहोगाव येथे युवकावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: March 11, 2017 02:06 IST

पंचनाम्यावर स्वाक्षरी केल्याच्या रागातून घडली घटना.

सायखेड(अकोला), दि. १0- गेल्या दीड वर्षांंपूर्वी घडलेल्या विनयभंगाच्या प्रकरणात पंच म्हणून स्वाक्षरी केल्याच्या कारणावरून चार जणांनी एका युवकावर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना ९ मार्चच्या रात्री ७.३0 वाजता चोहोगाव येथील मुख्य चौकात घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध बाश्रीटाकळी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी फरार झाले आहेत.चोहोगाव येथील नीलेश इंगळे याच्यावर एका आदिवासी युवतीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात गजानन गंगाधर गालट या युवकाने पंच म्हणून पंचनाम्यावर स्वाक्षरी केली होती. आपल्याविरुद्ध गजानन गालट याने न्यायालयात साक्ष दिल्याचा गैरसमज नीलेश इंगळे याला झाला. ९ मार्च रोजी गजानन गालट हा गावातील मुख्य चौकात बसलेला होता. त्यावेळी नीलेश इंगळे याने हातातील कुर्‍हाडीने गजानन गालटवर सपासप वार केले. या हल्ल्यात गजानन गालट गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याने कसेबसे आपले घर गाठले. त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने बाश्रीटाकळी येथे उपचारार्थ दाखल केले. घटनेची माहिती पोलीस पाटील मनोहर कोहर यांनी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रात्री चोहोगाव गाठून घटनेची माहिती घेतली. तसेच १0 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, प्रिया पाटील, ठाणेदार सतीश पाटील, बीट जमादार राजाभाऊ बचे, पोकॉ रामेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणी महादेव गंगाधर गालट यांच्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी पोलिसांनी नीलेश इंगळे, उमेश इंगळे, राजेश इंगळे व गोवर्धन इंगळे यांच्याविरुद्ध कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सतीश पाटील करीत आहेत.  लग्नावर आलं विघ्न! या गंभीर घटनेमुळे आरोपीच्या घरासमोर असलेल्या इंगळे कुटुंबीयांच्या लग्नावर विघ्न आले. अभिमन्यू इंगळे यांचा मुलगा धीरज याचा मंगल परिणय १0 मार्चला असल्यामुळे ९ मार्चच्या रात्री मेहंदी व हळद लावण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. घरासमोर मंडपही टाकण्यात आला होता. थाटात होणार्‍या लग्नसोहळ्य़ाला या घटनेमुळे पूर्णविराम देऊन, अखेर गाजावाजा न करता साध्या पद्घतीने बुद्ध विहारात हा विवाह सोहळा संपन्न झाला.