शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तुमची मदत वाचवू शकते चिमुकल्या तेजसचा प्राण!

By admin | Updated: January 7, 2017 02:37 IST

किडनीचा आजार; गरीब परिस्थितीमुळे तेजसवरील शस्त्रक्रिया थांबली.

अकोला, दि. ६- संकट हे कधीही गरीब, श्रीमंती पाहून येत नाही. संकट आल्यावर श्रीमंत त्यातून मार्ग शोधून काढेल; परंतु गरीब..नाही. गरिबावर आलेल्या संकटाला परतवून लावण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो. प्रसंगी संकटही त्याच्यावर मात करून जाते. अशीच काहीशी परिस्थिती चिमुकला तेजस डांगे आणि त्याच्या कुटुंबाची झाली आहे. तेजसवर आलेलं संकट कसं परतवून लावायचे, या विचारात तेजसचे आजी-आजोबा आसवं गाळत आहेत. नातवाला वाचविण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत आहेत; परंतु या प्रय त्नांना सहृदयी समाजाच्या मदतीची गरज आहे, तुमची छोटीशी मदत, चिमुकल्या तेजसचे प्राण वाचवू शकते. तेजस शहादेव डांगे (९) हा किनखेड पूर्णा येथील राहणारा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तो तिसरीत शिकतो. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई-वडील दोघेही शेतमजूर. आजी अन्नपूर्णा, आजोबा रामकृष्ण डांगे हेसुद्धा शेतमजुरी करून घराला हातभार लावतात; परंतु दीड महिन्यांपूर्वी तेजस आजारी पडला. अनेक दवाखाने, डॉक्टरांकडे त्याला दाखविले; परंतु आजाराचे निदान झाले नाही. डॉ. प्रशांत मुळावकर यांनी तेजसची तपासणी केल्यावर त्याची एक किडनी निकामी झाली आहे. दुसरी निकामी होण्याच्या मार्गावर आहे; परंतु शस्त्रक्रिया करून ही किडनी वाचविता येईल, असा विश्‍वास डॉ. मुळावकर यांनी तेजसच्या कुटुंबीयांना दिला; परंतु तेजसच्या घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी लागणारे ७0 हजार रुपयेसुद्धा डांगे कुटुंबीयांकडे नाहीत. तेजसचे प्राण वाचले पाहिजेत, यासाठी त्याचे आजी-आजोबा धावपळ करीत आहेत; परंतु मार्ग दिसत नसल्याने ते हतबल झाले आहेत. पोटचा गोळा वाचला पाहिजे. यासाठी मदतीची याचना करीत आहेत; परंतु त्यांना कोठूनही मदत मिळाली नाही. तेजसचे प्राण वाचविण्यासाठी सहृदयी, दानशूर समाजाने पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. समाजाच्या मदतीमुळे चिमुकल्या तेजसचे प्राण वाचतील आणि त्याच्या चेहर्‍यावर हसू फुलेल..तुमचं भरलं आभाळ होईल..मंदिरामध्ये देणगी देण्यापेक्षा, मंदिरांच्या पायर्‍या झिजविल्यापेक्षा दु:खितांची सेवा करा. त्यांच्या डोळय़ांतील अश्रू पुसा..हीच खरी ईश्‍वरसेवा आहे. तेजससुद्धा संकटात सापडला आहे. त्याला आजारातून बरे करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. दुसर्‍यांना मदत करणार्‍यांच्या ईश्‍वर सदैव पाठीशी उभा राहतो. म्हणून प्रसिद्ध कवी प्रवीण दवणेसुद्धा म्हणतात.. त्यांना चार दाणे द्या..तुमचं हिरवं झाड होईल..त्यांना थोडं पाणी द्या..तुमचं भरलं आभाळ होईल..ज्यांच्या अंगणात झुकले ढग..त्यांनी ओंजळ पाणी द्यावे..मग कराल ना, चिमुकल्या तेजसला मदत.. सहृदयी समाजाने मदत देण्यासाठी ९६२३२४२३८४ या क्रमांकावर संपर्क साधावा.