शहरं
Join us  
Trending Stories
1
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
2
निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?
3
'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?
4
१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक
5
अनिल अंबानींशी संबंधित कंपन्यांवर ED चे छापे, मुंबईत कारवाई; कारण काय..?
6
चॉकलेट, कार, व्हिस्की...; FTA करारानंतर स्वस्त होणार 'या' वस्तू; पण इंग्लंडला काय फायदा होणार?
7
कुणाल खेमूच्या 'कलयुग'मधली रेणुका आठवतेय का? इंडस्ट्रीला केला रामराम अन् बनली पोल डान्सर
8
Janhvi Kapoor : कल्याणमधील तरुणीला मारहाणीचा व्हिडिओ बघून संतापली जान्हवी कपूर, म्हणाली....
9
Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!
10
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
11
हृदयद्रावक! वडिलांना चहा देऊन गेली अन्...; मासिक पाळीचा त्रास असह्य, मुलीने संपवलं आयुष्य
12
ऑनलाईन रमीच्या नादात शिक्षिका चोर बनली,बुरखा घालून ८ लाखांवर डल्ला मारला; चेहऱ्यावरील तीळामुळे सापडली
13
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
14
आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाहीत; RBI नं रद्द केला या बँकेचा लायसन्स, पुढे काय होणार?
15
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
16
‘ती’ मुलगी घरातच ठरली असुरक्षित; वडील, भावांसह चौघांचा ११ महिने लैंगिक अत्याचार
17
सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण
18
गुरुपुष्यामृतयोगात श्रावणारंभ: श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी? योग्य पद्धत, दानमहात्म्य
19
अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा
20
Shravan 2025: श्रावणातले सण, पूजाविधी, कुलधर्म कुळाचार आणि त्याचे फळ; सविस्तर माहिती वाचा!

सुदृढ आरोग्यासाठी पोलिसांना ‘योग’ मंत्र!

By admin | Updated: June 9, 2016 01:58 IST

योग प्रशिक्षित पोलीस देणार योग-प्राणायामचे धडे.

अकोला: सण, उत्सव, जयंती, ईदसारख्या उत्सवामध्ये पोलिसांना सातत्याने बंदोबस्त करावा लागतो. कामाचा ताण वाढल्याने पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यातून अनेक कर्मचार्‍यांना बळीसुद्धा जावे लागले. पोलिसांवरील ताण कमी व्हावा, त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभावे, या दृष्टिकोनातून आता पोलिसांना ह्ययोग मंत्रह्ण देण्यात येणार आहे. पोलिसांमधीलच कर्मचार्‍यांनी योग-प्राणायामाचे प्रशिक्षण घ्यावे किंवा ज्यांनी प्रशिक्षण घेतले असेल, अशा कर्मचारी-अधिकार्‍यांची नावे पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविण्याच्या ठाणेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांची बैठक गुजरातला झाली होती. या बैठकीमध्ये पोलीस खात्यात योग प्रशिक्षक तयार करण्यावर भर देण्यात आला होता. तसे आदेशही राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले होते; परंतु योग प्रशिक्षणाच्या अंमलबजावणीस पोलीस खात्याला मुहूर्त काही सापडला नाही. आता राज्याची सूत्रे प्रवीण दीक्षित यांनी स्वीकारल्यानंतर पोलीस खात्यात पुन्हा योग वारे वाहू लागले आहेत. पोलिसांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सततचा बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास यामुळे पोलिसांवर मानसिक ताण पडतो. आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. गत काही वर्षांमध्ये जिल्ह्यात अनेक पोलीस कर्मचार्‍यांना हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांना बळी पडावे लागले आणि त्यात त्यांना प्राण गमवावे लागले. कामाच्या ताणाची स्थिती लक्षात घेता, पोलिसांनी ताण न घेता काम करता यावे, यासाठी योग मंत्राचा उपाय शोधून काढण्यात आला आहे. पोलीस ठाण्यांमधील कर्मचारी-अधिकार्‍यांना योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी ठाण्यातीलच काही कर्मचार्‍यांना योग प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांना योग प्रशिक्षण घ्यावे, त्यासंबधीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा किंवा ज्यांनी योग प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशा पोलीस कर्मचार्‍यांची नावे पोलीस अधीक्षक कार्यालयाला कळविण्याच्या सूचना सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या आहेत.