शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाची नोकर भरती एक महिन्यात

By admin | Updated: November 30, 2014 22:22 IST

१४३ जागांसाठी २९४३ अर्ज, छाननी प्रक्रिया वेगात.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदाच्या १४३ जागांसाठी २९४३ अर्ज कृषी विद्यापीठाला प्राप्त झाले असल्याने, नोकर भरती निवड समितीच्या देखरेखीत कृषी विद्यापीठ प्रशासनाने या अर्जाची छाननी सुरू केली आहे. या छाननीनंतर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून, या सर्व प्रक्रीयेला एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. पंधरा दिवसापूर्वी नोकरभरतीचे आदेश धडकल्यानंतर भरती प्रक्रिया निवड समितीने राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठांमध्ये भरती प्रक्रियेला सुरू वात केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दोन हजाराच्यावर रिक्त पदे आहेत. तथापि, भरती प्रक्रियेत अनेक अडथळे येत गेल्याने नोकरभरतीचा अनुशेष वाढतच गेला. एक वर्षापूर्वी कृषी विद्यापीठ प्रशासनाने काही रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढली होती; परंतु या नोकर भरतीला विलंब झाला होता. पंधरा दिवसापूर्वी शासनाने नोकर भरती करण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याने एक वर्षापासून रखडलेली ही रिक्त पदे भरण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. शासनाने काढलेल्या आदेशात कनिष्ठ व वरिष्ठ साहाय्यक संशोधकापर्यंतची पदे जुन्याच पद्धतीने भरण्याचे अधिकार कृषी विद्यापीठांना मिळाल्याने कृषी विद्यापीठ स्तरावर नोकर भरती निवड समित्या गठीत करण्यात आल्या असून, समिती अध्यक्षाच्या देखरेखीत प्राप्त अर्जाची छाननी सुरू झाली आहे.  डॉ. पंदेकृविच्या शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी २९४३ अर्जाची छाननी प्रशासन स्तरावर सुरू असून एक महिन्यात सर्व प्रक्रिया आटोपण्याची शक्यता वर्तवली आहे. - सर्वाधिक अर्ज ह्यजेआरएह्णसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वरिष्ठ, कनिष्ठ संशोधन साहाय्यक व इतर पदे भरण्यात येणार असल्याने सर्वाधिक १६00 च्या जवळपास उमेदवारांनी कनिष्ठ संशोधन साहाय्यक (जेआरए) पदासाठी अर्ज केले आहेत. ९0 अर्ज वरिष्ठ संशोधन साहाय्यक (एसआरए) पदासाठी केले आहेत. - ८३ बडतर्फ कर्मचार्‍यांचे अर्ज भरती प्रक्रियेतील अनियमीततेमुळे विद्यापीठाचे ८३ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले होते. विद्यापीठाने सहा महिन्यांच्या आत भरती प्रक्रिया राबवून या ८३ कर्मचार्‍यांना संधी द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने या नोकर भरतीसाठी ८३ बडतर्फ कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन साहाय्यकांनी अर्ज केले असून, आता हे सर्व कर्मचारी मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहेत.