संतोष येलकर/अकोलादरवर्षी दिवाळीच्या दिवसात जाणवणारी थंडीची हुडहुड अद्यापही सुरु झाली नाही. वातावरणातील उकाडा कायम असून, यंदाची दिवाळी थंडीच्या हुडहुडीविनाच साजरी होत आहे.दरवर्षी दिवाळीच्या दिवसात थंडीचे वातावरण असते. या दिवसात रात्री आणि सकाळच्यावेळी वातावरणात गुलाबी थंडी असते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी पहाटे-पहाटे अभ्यंग स्नानाचा आनंद वेगळाच असतो. यावर्षी मात्र वातावरणात थंडीऐवजी उकाडाच जास्त आहे. दिवसा ऊन आणि संध्याकाळी उकाडा, अशा वातावरणात यंदाची दिवाळी साजरी होत आहे.ऑक्टोबर अखेरपर्यंत वातावरणात उष्णता असते. यावर्षी ऑक्टोबरमध्ये दिवाळी आल्याने, दिवाळीच्या दिवसात उकाड्याचे वातावरण जाणवत आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे वारे लवकरच सुरु होतील आणि १ नोव्हेंबरपासून थंडी सुरु होईल, असा अंदाज असल्याचे पूणे येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी कळवले.
यंदाची दिवाळी थंडीविनाच!
By admin | Updated: October 23, 2014 01:43 IST