शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

यंदा होणार विद्यार्थ्यांनी घडविलेल्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

By admin | Updated: August 21, 2015 00:43 IST

सामाजिक वनीकरणचा उपक्रम, कृतीतून साकारणार ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’, शाळांना देणार मुर्त्यांचे साचे.

प्रवीण खेते/अकोला : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केवळ जनजागृती नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करण्याची तयारी सामाजिक वनीकरण विभागाने केली आहे. त्याअनुषंगाने या विभागाने श्रींच्या मूर्तीचे साचे तयार केले आहेत. त्याद्वारे शाळांना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांकडून मातीच्या मूर्त्या करून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घडविलेल्या श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना यंदाच्या गणेशोत्सवात होणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे नदीमध्ये दरवर्षी मोठय़ा प्रमाणात विसर्जन करण्यात येते. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने त्यांचे अवशेष नदीकाठी भग्नावस्थेत पडून मोठय़ा प्रमाणात विटंबना होते. वर्षानुवर्षे असाच प्रकार सुरू असल्याने नदी पात्रात प्लास्टर ऑफ पॅरिसचा थर साचतो. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरत नसल्याने भूजल पातळी वाढण्यास अडथळा निर्माण होत आहे. पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी दरवर्षी विविध संघटनांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जनजागृती करण्यात येते. तरीदेखील नागरिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. जनजागृती करूनही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक वनीकरण विभागाने यंदा जनजागृतीसोबतच कृतीवर अधिक भर देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरणाच्या अकोला विभागाने श्रींच्या मूर्तीचे दहा साचे तयार केले आहे. या विभागामार्फत जिल्ह्यातील शाळांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. एका प्रशिक्षण वर्गामध्ये दहा शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रत्येक शाळेला दहा दिवसांसाठी एक साचा देण्यात येणार आहे. या साचाच्या साहाय्याने शिक्षक इच्छुक विद्यार्थ्यांंकडून मातीच्या गणेशाची मूर्ती तयार करवून घेणार आहेत. मूर्तीच्या निर्मितीनंतर विद्यार्थी स्वत:च्या कल्पकतेनुसार रंगरंगोटी करतील. त्यामुळे स्वत: गणेशमूर्तीची निर्मिती करून त्याची प्रतिष्ठापना करण्याचा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये वाढण्यास मदत होईल.

अकोल्यातून उपक्रमास प्रारंभ

          सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जनजागृती करण्यात येते; परंतु यंदा प्रत्यक्षात कृती करण्याचे ध्येय सामाजिक वनीकरणाच्या अकोला विभागाने डोळय़ासमोर ठेवले आहे. प्रत्यक्ष कृतीचा हा एक आगळा-वेगळा प्रयोग अकोला विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

असा होईल उपक्रम

        या उपक्रमांतर्गत एका कार्यशाळेमध्ये दहा शाळांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित शाळेला दहा दिवसांसाठी प्रत्येकी एक साचा देण्यात येणार असून, दहा दिवसांमध्ये शंभर गणेश मूर्ती तयार होतील. एका शाळेच्या शंभर म्हणजे दहा दिवसात दहा शाळांच्या एक हजार गणेश मूर्ती तयार होतील. दुसर्‍या दहा दिवसांसाठी इतर दहा शाळांना साचांचे वितरण करण्यात येणार आहे. याप्रमाणे गणेशोत्सवापर्यंंत जास्तीत जास्त शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट सामाजिक वनीकरण विभागाने ठेवले आहे.