शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून गायब कर्मचा-यास केले रुजू

By admin | Updated: December 20, 2014 00:45 IST

अकोला जिल्हा हिवताप कार्यालयातील गैरप्रकार.

अकोला : पिजरनजीक पारद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य साहाय्यक म्हणून कार्यरत संदेश प्रधान ७ नोव्हेंबर २0११ ते २३ सप्टेंबर २0१४ या कालावधीत ड्युटीवरून गायब झाले होते. त्यानंतरही या कर्मचार्‍याला रुजू करून घेत आवश्यक असलेल्या नियम व अटी पायदळी तुडवण्याचा प्रताप जिल्हा हिवताप अधिकार्‍यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.शासकीय सेवेत कार्यरत असताना एखादा कर्मचारी एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ कुठलेही कारण न सांगता गैरहजर राहिल्यास सदर कर्मचार्‍यास पुन्हा रुजू करून घेताना स्थानिक पोलीस ठाण्याचा अहवाल मागवला जातो. या अहवालामध्ये एक वर्षामध्ये संबंधित कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल झाला का, तुरुंगात होता का, याबाबत स्पष्टपणे नमूद केले जाते. यासोबतच वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्रही द्यावे लागते. त्यावर सदर कर्मचार्‍यास गत वर्षभराच्या काळात कोणता आजार झाला का, तो वर्षभरानंतर काम करण्यास फीट आहे का, याबाबतची पूर्ण शहनिशा केली जाते. यानंतरच कर्मचार्‍यास रुजू करून घेण्याचा नियम आहे. तथापि, जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकार्‍यांनी या प्रकाराची कुठलीही चौकशी न करता शासकीय नियम धाब्यावर बसवून संदेश प्रधान यांना कुरुम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रु जू केले आहे. प्रधान यांनी यापूर्वी पारद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गवई यांच्यासोबतच वाद घातल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बोरगाव मंजू येथे असताना सर्वेक्षणाकरिता त्यांनी खासगी व्यक्तीची नेमणूक केली होती. या प्रकरणात तक्रार झाल्यानंतर प्रधान यांना निलंबितही करण्यात आले होते. आता पुन्हा एक वर्ष गायब झाल्यानंतर प्रधान यांना नियम धाब्यावर बसवून कुरुम प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून, दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे