अकोला: तीन दिवसांपासून वसंत देसाई क्रीडांगण येथे सुरू असलेल्या अमरावती विभागीय जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवित यवतमाळ जिल्हा संघाने विजेतेपद पटकाविले. उपविजेता यजमान अकोला संघ राहिला. स्पर्धेच्या दुसर्या दिवसापर्यंंत यजमान अकोल्याचा दबदबा होता. समारोपाच्या दिवशी झालेल्या मैदानी खेळ स्पर्धेत यवतमाळच्या खेळाडूंनी भरीव कामगिरी करीत अकोल्याची पीछेहाट केली.अंतिम सामन्यात क्रिकेटमध्ये अकोला संघाने बुलडाणा संघाचा पराभव केला. फुटबॉलमध्ये बुलडाणा संघाने अकोला संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मैदानी खेळ स्पर्धेत १00 मी. धावणे प्रकारात राजेश माने, अमरावती, अर्जुन गिरी बुलडाणा, महिलांमध्ये मोहना आवारे यवतमाळ, वैशाली दहीभात वाशिम, २00 मी.धावणेमध्ये बुलडाण्याचे गजानन वाटसर, धनराज चव्हाण वाशिम, महिलामध्ये मोहना आवारे यवतमाळ, वाशिम शुभांगी गंधे, ४00 मी. धावणे अमरावतीचे राजेश माने, यवतमाळचे नितीन डहाके, महिलांमध्ये यवतमाळच्या उषा टेकाम, अकोल्याच्या यमुना बुटे, १५00 मी. धावणेमध्ये यवतमाळचे रवी बुरकुले, अमरावतीचे गजानन भातकुलकर, महिलांमध्ये शुभांगी गंधे वाशिम, गोकुळा झाडोकार अकोला यांनी प्रथम व द्वितीय स्थान पटकाविले. ४ बाय १00 मीटर रिलेमध्ये पुरुषांच्या गटात अकोला संघ विजेता, उपविजेता यवतमाळ संघ राहिला. महिलांच्या गटात यवतमाळ संघाने विजेतेपद मिळविले. वाशिम संघ उपविजेता राहिला. गोळाफेकमध्ये मारोती इंगळे वाशिम, पंकज आसरे अमरावती, महिलांमध्ये शालिनी मारोडे अकोला, ज्योती मसराम यवतमाळ, थाळीफेकमध्ये वाशिमचे मारोती इंगळे, अमरावतीचे चैत्राम जाम्बू अमरावती, लांबउडीमध्ये पुरुष गटात वसीम अहमद यवतमाळ, अमरावतीचे प्रवीण मडावी, महिलांमध्ये यमुना बुटे अकोला, बुलडाण्याच्या निर्मला गोपनारायण, उंचउडीमध्ये दयाराम भिल्लावेकर अमरावती, यवतमाळचे विजय मारकड, महिलांमध्ये वाशिमच्या अश्विनी भोळसे, बुलडाण्याच्या वैशाली जाधव यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला.
यवतमाळला सर्वसाधारण विजेतेपद; अकोला उपविजेता
By admin | Updated: January 19, 2015 02:35 IST