शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

यशोवर्धन, मंदार करणार जर्मनीत भारताचे प्रतिनिधित्व

By admin | Updated: April 18, 2017 00:06 IST

अकोला : जर्मनीत सुरू असलेल्या जागतिक टेबल-सॉकर अजिंक्यपद स्पर्धा २०१७ मध्ये अकोल्यातील यशोवर्धन अनिल जुमळे व मंदार राजू झापे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

जागतिक टेबल-सॉकर स्पर्धाअकोला : जर्मनी येथील हंबुर्ग शहरात सुरू असलेल्या जागतिक टेबल-सॉकर अजिंक्यपद स्पर्धा २०१७ मध्ये अकोल्यातील यशोवर्धन अनिल जुमळे व मंदार राजू झापे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धा १६ ते १८ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यजमान जर्मनीचा संघ, तर आॅस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, युक्रेन, अमेरिका व यूके या दिग्गज देशातील खेळाडूंना भारतातील खेळाडू टक्कर देत आहेत.यशोवर्धन हा अनुभवी खेळाडू असून, यापूर्वी त्याने चीन, मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेत भारताला पदक मिळवून दिले आहे. मंदार याने आपल्या प्रो सिंगल या क्रीडा प्रकारात प्रथमच जागतिक क्रमवारीत स्थान मिळविले आहे. स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू एकत्रित प्रो डबल व प्रो सिंगल या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. भारतीय टेबल सॉकर फेडरेशनचे महासचिव मनोज सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील एकूण ९ खेळाडूंचे पथक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या खेळाडूंना प्रशिक्षक शिवाजी चव्हाण (अकोला) यांचे प्रशिक्षण लाभले आहे. यशोवर्धन जुमळे व मंदार झापे यांनी २ ते ८ जानेवारी रोजी छत्रसाल स्टेडिअम नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय टेबल-सॉकर स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत जागतिक स्पर्धेकरिता स्थान निश्चित केले होते. राष्ट्रीय टेबल सॉकर स्पर्धेचे आयोजन इंडिया टेबल-सॉकर फेडरेशन संलग्न स्कूल गेम फेडरेशन आॅफ इंडिया व जागतिक टेबल सॉकर फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली केले होते. यशोवर्धन व मंदार यांच्याकडून अकोलेकरांना पदकाची आशा आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजचे संचालक प्रा. नितीन बाठे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, महाराष्ट्र टेबल-सॉकर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जुमळे यांनी दोघांचेही कौतुक करू न विजयाच्या शुभेच्छा दिल्या.