शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय मंडळाने दिला चुकीचा अहवाल

By admin | Updated: June 4, 2016 02:18 IST

पात्र दिव्यांग उमेदवार नोकरीतून ठरला अपात्र!

अकोला: महावितरण अकोला ग्रामीण विभागात विद्युत सहायक पदावर अंकुश बर्वे या अपंग उमेदवाराची नियुक्ती झाली होती; परंतु वैद्यकीय मंडळ अकोलाने अंकुशची शारीरिक क्षमता तपासणी न करता चक्क अपंगत्वाची तपासणी करून त्याला चाळीस टक्क्यांच्या आत अपंग प्रमाणपत्र देऊन त्याला नोकरीत अपात्र ठरविले. वैद्यकीय मंडळ अकोलाच्या चुकीमुळे एका अपंग उमेदवाराचे नुकसान झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बरडे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत केला. अपंग अंकुश बर्वे हा गरीब कुटुंबातील मुलगा असून, तो ५२ टक्के अपंग आहे. तसे त्याच्याकडे अपंग प्रमाणपत्र आहे. त्याची महावितरणमध्ये विद्युत सहायक पदावर नियुक्ती झाली होती; परंतु वैद्यकीय मंडळ अकोलाने त्याची शारीरिक क्षमता तपासणी न करता अपंगत्वाची तपासणी करून चाळीस टक्क्याच्या आत अपंग असल्याचे प्रमाणपत्र दिले. परिणामी अंकुशवर आता अपंग प्रवर्गात मोडल्या जात नसल्यामुळे नोकरीतून अपात्र ठरण्याची वेळ आली आहे. अंकुशला न्याय मिळावा यासाठी अपंग कर्मचारी, अधिकारी संघटना पाठपुरावा करीत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार अपंगाची तपासणी करता येत नाही; परंतु वैद्यकीय मंडळाने त्याची तपासणी करून त्याला नोकरीतून अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला. अंकुशची १0 फेब्रुवारी २0१६ रोजी नियुक्ती झाली. नियुक्ती होताच नियमानुसार अपंग कर्मचारी काम करण्यास सक्षम आहे किंवा नाही, याची तपाणी व अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना सेवेत रुजू करता येते. यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांनी अंकुशला जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविले; परंतु त्यांनी त्याला वैद्यकीय मंडळाकडे पाठविले. वैद्यकीय मंडळाने मात्र त्याला ५२ टक्के अपंग असूनही ४0 टक्क्याच्या आत अपंग असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला. असल्याचा आरोप संजय बरडे यांनी केला. पत्रपरिषदेला अंकुश बर्वे, संघटनेचे सचिव मो. अजिज अब्दुल रशिद, कोषाध्यक्ष अविनाश वडतकर, रवींद्र देशमुख, श्याम राऊत, रमेश बेंबरगे, गणेश महल्ले आदी उपस्थित होते.